Assembly Election Chandrashekhar Bawankule esakal
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election : 2024 ला संग्रामसिंह देशमुख भाजपचे आमदार असतील; सांगलीत बावनकुळेंचं सूचक विधान

कार्यकर्त्यांनी संग्रामसिंहांच्या पाठीशी ताकद उभी करावी.

सकाळ डिजिटल टीम

संग्रामसिंह टेंभूचे शिल्पकार संपतराव देशमुख यांचा विकासाचा वारसा चालवत आहेत.

कडेगाव : ‘‘सन २०२४ मध्ये पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून (Palus-Kadegaon Assembly Constituency) संग्रामसिंह देशमुख भाजपचे आमदार असतील,’’ असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला.

रायगाव (ता. कडेगाव) येथे संग्रामसिंह देशमुख (Sangramsingh Deshmukh) यांच्या निवासस्थानी आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उपस्थित होते.

ChandrashekharBawankule

बावनकुळे म्हणाले, ‘‘संग्रामसिंह टेंभूचे शिल्पकार संपतराव देशमुख यांचा विकासाचा वारसा चालवत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगलीचे नाव देशपातळीवर नेले. दिव्यांग नोंदणी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण व चौफेर विकासासाठी ते कटिबद्ध आहेत.’’

‘‘पलूस-कडेगाव मतदारसंघातील सर्व विकासकामांना लागेल तेवढा निधी दिला जाईल. मतदारसंघ विकासाचा ‘रोल मॉडेल’ ठरेल. कार्यकर्त्यांनी संग्रामसिंहांच्या पाठीशी ताकद उभी करावी. निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करावे,’’ असे आवाहन बावनकुळेंनी केले.

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, ‘‘ प्रतिकूल परिस्थितीतही संपतराव देशमुख यांना स्वाभिमानी कार्यकर्ते व जनतेने आमदार केले. त्यांनी दुष्काळ हटविण्यासाठी टेंभू योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्यां घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे पलूस-कडेगावचा विकास करावयाचा आहे.’’

मुंबई जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, प्रकाश गढळे, अशोक साळुंखे, मिलिंद पाटील, स्थानिक नेते रविराज देशमुख, विश्वतेज देशमुख आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT