पश्चिम महाराष्ट्र

Lockdown2 : तब्बल 125 सापांना जीवदान देणारा अवलीया सर्पमित्र

सचिन शिंदे

कऱ्हाड ः लॉकडाऊनच्या काळात अनेकजन वेगवेगळे प्रयोग करत आहेत. कऱ्हाडच्या अवलीया सर्प मित्राने संचारबंदी अन् लॉकडाऊनच्या तीस दिवसांच्या काळात शहर व परिसरात तब्बल 125 वेगवेगळ्या प्रकारचे सापांना जीवदान दिले आहे. शहरासह तालुक्यातील विविध घरात, दारात किंवा अडगळ्यांच्या खोलीत आढळलेल्या सांपाना जीवंत पकडून त्यांना सुरक्षीत स्थळी त्याने सोडले आहे. वनविभागाने आपत्ती काळात साप किंवा अन्य प्राणी नागरी वस्तीत आल्यास त्यांना पकडण्यासाठी येथील अजय महाडीक यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी ते साप पकडून सुरक्षीतस्थळी सोडले आहे. त्यात नाग, घोणस यासारख्या केवळ दोन ते तीन विषायरी जातीच्या साप वगळता सापडलेले अन्य सर्व बिनविषारी आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात पक्षी, प्राणी यांचा मुक्त विहार सुरू आहे. अशा कालवधीत सापही शहर व परसिरात मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. 22 मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊन व संचारबंदीपासून काल परवापर्यंत शहर व पसिरात वेगवेगळ्या सुमारे 125 सापांच्या जातींचा वावर आढळला आहे. येतील वन विभागाने आपत्ती काळात सापांसह जंगली प्राण्यांचा वावर वस्ती वाढल्यास त्याला पकडम्यासाठी व रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी काहींची नेमणूक केली आहे. त्यात साप निघाल्यास त्याला पकडण्यासाठी सर्प मित्र येथील मंगळवार पेठेतील अजय महाडीक ( 9604392338) यांची नेमणूक केली आहे. त्याबाबतचे पत्र वन विभागाने त्याला दिले आहे. 22 मार्चलाच महाडीक याची त्या कामासाठी वन विभागाने नियुक्ती केली आहे. महिनाभरात नागरी वस्तीत शिरलेले तब्बल 125 साप महाडीक यांनी पकडले आहे. त्यात दोन तीन विषारी जातीचे साप त्यांना सापडले आहेत. त्यात घोणस, नाग, मणेर जातीचा समावेस आहे. अन्यथा बहुतांशी बिनविषारी सापांचीच संख्या जास्त आहे. त्यात गवत्या, कवड्या, धामण, भितींवरील वावरणार साप अशा बिनविषारी सांपाचा समावेश आहे. 

वन विभागाने नियुक्ती केल्यानंतर दोनच दिवसात संचारबंदीही लागू झाली. त्या कालावधीत वन विभाग पोचण्यापूर्वी रेस्क्यू ऑपरेशन किंवा सापांना वाचविण्याची जबाबादरी वनविभागाने महाडीक यांच्याकडे दिली आहे. तसे पत्रही त्यांनी दिले आहे. त्यानुसार अजय महाडीक सापांना जीवनादान देत आहे. लॉकडाऊनच्या महिनाऊराच्या कालवधीत एका दिवसात किमान चार ते पाच साप पकडावे लागतात, असे अजय महाडीक यांनी सकाळशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, रात्री अपरात्री केव्हाहीं फोन येतो. साप निघालाय काय करून त्यावेळी तुम्ही लक्ष ठेवा पोचतोच असे सांगून सापाला मारण्या पासून रोखण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात एकही साप मारून दिलेला नाही. रात्री एख किंवा पहाटे तीनच्या सुमारालाही कॉल आला की, तो साप पकडण्यासाठी आम्ही तालुक्यात कोठेही पोचतेच. त्यामुळे सर्प संरक्षणाचे चांगेल काम होवू लागले आहे. लोकातूनही आता जागृती येवू लागील आहे. त्यामुळे सांपाना मारण्यापेक्षा त्यांना सुरक्षीतस्थळी सोडण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. 


सापाला मारण्यापेक्षा त्यात सुरक्षीतस्थळी सोडण्याची नागरीकांची मानसिकता जास्त झाली आहे. त्यामुळ लॉकडाऊनच्या काळात एकही साप लोकांनी मारलेला नाही, असेच दिसते. साप दिसला की, ते लगेच कॉल करतात. त्याला पकडून तो सुरक्षीतस्थळी सोडून देतो. त्यामुळे नागरीकांमध्ये सापांच्या प्रती जागृकता वाढली आहे. 

अजय महाडीक, सर्पमित्र, कऱ्हाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT