पश्चिम महाराष्ट्र

श्री ब्रह्मचैतन्य महाराज संस्थानचे अखंड मदत कार्य सुरुच; ससूनला पंचवीस लाखांचा निधी

सकाळ वृत्तसेवा

गोंदवले (जि.सातारा)  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांना आधार देण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराज संस्थानकडून आणखी पंचवीस लाखांचा निधी शासनाला देण्यात आला आहे. गोंदवल्यातील या संस्थानने आत्तापर्यंत एक कोटी रुपयांच्या निधींबरोबरच हजारो कुटुंबीयांसाठी शिधा देऊन श्रींच्या दातृत्वाची जोपासना केली आहे.
 
कोरोनाने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. महाराष्ट्रात देखील सध्या बाराशेहून अधिक रुग्ण असून बाधित रुग्णांची झपाट्याने वाढतच आहे. ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी शासनाचे सर्व प्रयत्न सुरूच आहेत. राज्यातील अनेक रुग्णालयांतून डॉक्‍टर्स, परिचारिका, कर्मचारी, अधिकारी याशिवाय सर्वच अत्यावश्‍यक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आवश्‍यक बाबींची कमतरता भासू लागली आहे. या सर्वांचा विचार करून मानवतेच्या भावनेतून गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज संस्थानने पंतप्रधान मदत निधीत पन्नास लाख रुपये जमा केले होते. तसेच धर्मादाय आयुक्तांच्या विनंतीनुसार पुणे येथील ससून रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता.

सद्य:स्थिती लक्षात घेऊन आता कोरोनावर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याने संस्थानने आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणखी पंचवीस लाखांचा धनादेश प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे सुपूर्त केला. त्यामुळे संस्थानकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आत्तापर्यंत एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय संचारबंदी काळात जिल्ह्यातील विविध भागांतील अडीच हजारहून अधिक गरजूंना कोरड्या शिद्याचे वाटप केले आहे. गरजेप्रमाणे आणखी शिधावाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या विश्वस्तांनी दिली. 

जय श्रीरामच्या जयघाेषाने दुमदुमले गाेंदवले

Coronavirus : ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ट्रस्ट सरसावले; 50 लाखांचा निधी जमा


वाईतील क्‍लबतर्फे पोलिस ठाण्यात सॅनिटायझर टनेल

वाई  : येथील रोटरी क्‍लबतर्फे वाई पोलिस ठाण्यात सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले आहे. यामध्ये 400 लिटर पाण्याची टाकी, अर्धा इंची किर्लोस्कर कंपनीची मोटार, सॅनिटायझर युनिट वुइथ ऑन-ऑफ बटण सिस्टिम असून, पाण्यामध्ये सोडियम हायड्रोक्‍लोराईड विशिष्ट प्रमाणात मिसळले जाते व त्याची फवारणी केली जाते. कोणतीही व्यक्ती या युनिटमध्ये 10 सेकंद उभी राहिली असता, त्याच्या कपड्यावरील सर्व जंतू मारले जातात. अशा प्रकारे पोलिस कर्मचारी ड्युटी संपवून घरी जाताना व इतर व्यक्तींशी संपर्कात आल्यानंतर या युनिटचा वापर करू शकतात.

पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी रोटरी क्‍लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी आभार मानले. याप्रसंगी क्‍लबचे अध्यक्ष रोटरी डॉ. शंतनू अभ्यंकर, सचिव दीपक बागडे, पोलिस नाईक विठ्ठल धायगुडे, पोलिस नाईक प्रशांत शिंदे, बापूराव मदने व इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Festival: माधुरीचं काय चुकलं? पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायची सुमित्रा हत्तीण, काय आहे इतिहास?

शाहरुख-दीपिका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल! कोर्टाच्या आदेशानंतर दाखल झाली एफआयआर, नक्की काय आहे प्रकरण?

Ganesh Chaturthi 2025: एकदंतासमोर राशींनुसार करा 'या' मंत्रांचा जप, अडचणींच्या फेऱ्यातून होईल सुटका

Dada Bhuse : ‘माझं गाव, माझी शाळा’ थीममध्ये शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश आरास

Latest Marathi News Updates : नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT