पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : उपचार ते अंत्यसंस्कार... आरोग्य कर्मचाऱ्यांचा लढा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्याच्या तयारीत असलेल्या प्रशासनाची एका रुग्णाच्या अचानक मृत्यूमुळे तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पहिलीच वेळ असल्याने मृतदेह बांधण्याच्या बॅगपासून ते अगदी अंत्यसंस्कारांच्या गाडीसाठीही बराच वेळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताटकळावे लागले. अंत्यसंस्कारासाठी लाकडे जमविण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत प्रशासनालाही कसरत करावी लागली. एकूणच कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारापर्यंत झगडावे लागल्याचे चित्र आज दिसले.
 
चौदा दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे दोन बाधित रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 14 दिवसांच्या उपचारानंतर रविवारी त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवालही काल निगेटिव्ह आला. त्यामुळे आणखी एकदा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्याच्या तयारीत आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन होते; परंतु आज सकाळी अचानक एका रुग्णाचा मृत्यू झाला. तो प्रशासनाला एक प्रकारचा धक्काच होता. कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कोणी काय करायचे हे कदाचित ठरले नसेल, त्यामुळे या प्रक्रियेत एकंदर सर्वांचा गोंधळ उडालेला दिसला. पालिका प्रशासनाकडून यामध्ये मदतीची अपेक्षा आरोग्य विभागाला होती; परंतु रुग्णालयात कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारापर्यंत झगडावे लागल्याचे चित्र होते.
 
संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर याबाबतची कल्पना जिल्हा रुग्णालयातून जिल्हा प्रशासन व पालिकेला देण्यात आली होती. त्यानुसार संबंधित रुग्णाचा मृतदेह गुंडाळण्यासाठी बॅग मागविण्यात आल्या होत्या; परंतु सुरवातीला ताडपदरीच रुग्णालयात आली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सांनी प्रशासनातील व्यक्तींना कल्पना दिल्यानंतर पुन्हा बॅग आल्या. कोरोनाबाधित रुग्ण असल्यामुळे मृतदेह बांधण्यासाठी विशेष दक्षता घेणे आवश्‍यक होते. त्यासाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विशेष पोषाख देण्यात आला होता. तो घालून त्यांनी मृतदेह बांधला; परंतु अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यासाठी बोलावलेली गाडीच बराच वेळ आली नाही. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांसह अनेक जण बराच काळ ताटकळत थांबले होते. काही वेळाने प्रांताधिकारीही तेथे आले; परंतु कोणीच गाडी द्यायला तयार होईना असा निरोप जिल्हा रुग्णालयात आला. त्यानंतर गाडी मिळतेय; पण चालक नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे शेवटी जिल्हा रुग्णालातील वाहनचालकालाच अंत्यसंस्काराची गाडी चालवावी लागली. जिल्हा शल्यचिकित्सक व प्रांताधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची समजूत काढत मनोबल वाढवत त्यांना संगम माहुली येथे जाण्यास तयार केले. 
एकीकडे रुग्णाची प्रकृती बिघडल्यापासून आरोग्य विभागाचा रुग्णालयात हा संघर्ष सुरू असताना प्रशासनाला लाकडांसाठीही झगडावे लागले. लाकडे देण्यासाठी कोणी समोर येत नसल्याचा निरोप आल्यावर अधिकाऱ्यांना कुलूप तोडून कारवाई करावी लागेल, असा इशारा द्यावा लागला. लाकडे मिळाल्यावर ती रचायची कोणी असा प्रश्‍नही प्रशासनासमोर होता. त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तोडगा काढला. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकंदरच या प्रक्रियेत आरोग्य विभाग व महसूल यंत्रणेलाच धावाधाव करावी लागली. पालिकेकडून अपेक्षित असलेली मदत त्यांना मिळाली नसल्याचे चित्र दिसत होते. 

सलून व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी

आत आणि बाहेर दोन्हीकडे झटायचे का? 

कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेणे. कोरोनासदृश्‍य लक्षणे असलेल्यांना तपासून दाखल करून घेणे. बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या उपचार करणे या सर्व गोष्टींसाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जीव धोक्‍यात घालून दिवस-रात्र काम करत आहेत. त्या कोणत्याही कामाला नकार दिलेला नाही. असे असताना रुग्णाच्या मृत्यूनंतर ही आरोग्य विभागाला सर्व काही करायला लावणे अन्यायकारक आहे. पहिलीच वेळ असल्यामुळे अडचण नको म्हणून सर्वांनी मदत केली. यापुढे अशी परिस्थिती उद्‌भवल्यास प्रशासनाने योग्य ते नियोजन करून जबाबदारीचे वाटप करावे, अशी मागणी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून येत होती.

सातारा : त्या काेराेनाबाधिताच्या मुलाचा रिपाेर्टही आला पाॅझिटीव्ह 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Ajinkya Rahane: क्रिकेट संपलं तुझं कौतुक कमी झालं, पण तूच आमचा खरा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई वडिलांचं भावूक पत्र व्हायरल

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

SCROLL FOR NEXT