पश्चिम महाराष्ट्र

आमच ठरलं : काेणत्या गावानं काेणत्या दिवशी बाजाराला यायचं

सकाळ वृत्तसेवा

तारळे (जि.सातारा) : तारळे ग्रामपंचायत व कोरोना समितीने दररोज गावनिहाय लोकांना बाजारपेठेत प्रवेश देण्याचे निश्‍चित केले आहे. यामुळे बाजारपेठेत अनावश्‍यक गर्दी टाळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तारळे विभाग हा डोंगरदऱ्यांत विस्तारलेला आहे. गावे व वाड्यांची संख्या अधिक असल्यामुळे तारळ्यात मोठी बाजरपेठ आहे. विभागातील सुमारे 80 हजार जनता या बाजरपेठेवर अवलंबून असल्याने येथे नित्य गर्दी असते. हे लोकडाउनदेखील त्यास अपवाद नाही. दररोज हजारोंची गर्दी वेगवेगळ्या कारणांनी होत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना शासन, गाड्या जप्त, चाकातील हवा सोडणे आदी उपाय करूनही गर्दीवर नियंत्रण येत नव्हते. चार दिवस जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक दुकाने व सेवा वगळता दुकाने बंद ठेवली तर शनिवार (ता. 16) व  (रविवारी) संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती. मात्र, तरीही अपेक्षित गर्दी कमी न झाल्याने ग्रामपंचायत व कोरोना समितीने त्यासाठी दररोज गावनिहाय लोकांना बाजारपेठेत प्रवेश देण्याचे निश्‍चित केले आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आजपासून (सोमवार) त्याची अंमलबजावणी करण्यात आले आहे. जिल्हा बॅंकेने केलेल्या अशा नियोजनामुळे गर्दी कमी झाली होती. त्यानुसार सर्व गावांनी सहकार्य केले तर गर्दीवर निश्‍चित नियंत्रण येईल, असा विश्वास सरपंच मीना परदेशी व उपसरपंच रामचंद्र देशमुख यांनी व्यक्त केला. 


...असे आहे गावनिहाय नियोजन 

सोमवारी ः वजरोशी व त्याखालील वाड्या, दुसाळे, बांधवाट, पाबळवाडी, घोट व त्याखालील वाड्या, भैरेवाडी, तारळे त्याखालील वाड्या. 
मंगळवारी- बांबवडे, कळंबे, आंबळे, सुंदरनगर, ढोरोशी, मरळोशी, या गावांखालील वाड्या, जळव, पठारावरील सर्व वाड्या. 
बुधवार- मालोशी, मुरुड दोन्ही गावांखालील वाड्या, कुशी, तोंडोशी, आवर्डे. 
गुरुवारी - कडवे बुद्रुक व कडवे खुर्द दोन्ही गावांखालील वाड्या, भुडकेवाडी, काटेवाडी, कोंजवडे. 
शुक्रवारी- नुने व त्याखालील वाड्या, लोरेवाडी, सावरघर, निवडे, राहुडे व वेखंडवाडी. 
शनिवारी-तारळे गाव. 
रविवारी- पूर्ण बंद असे गावनिहाय नियोजन केले आहे.

काय सांगता ! दारू दुकानच अनलॉक व्हयं

'त्या' महिलेच्या घरातून कोरोनाही बाहेर पडेना 

लग्नापुर्वीच जाेडीने महाराष्ट्रात धमाल उडवून दिली; सुप्रिया सुळेही खूष 

रयतची ग्रामीण महाविद्यालये नॅशनल रॅकींगमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT