पश्चिम महाराष्ट्र

Video : होम क्वारंटाईनचा नियम पाळा अन्यथा...

सकाळ वृत्तसेवा

वडूज : होम क्वारंटाईनचे नियम न पाळणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच या नियमांचे दोन वेळा उल्लंघन केल्यास संबंधितास संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी येथे दिली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मायणी (ता.खटाव) येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षास भेट दिली. त्यानंतर येथील तहसिलदार कार्यालयात खटाव माण तालुक्यांतील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, खटावच्या तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, माणच्या तहसिलदार बाई माने, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, पोलीस निरीक्षक अशोकराव पाटील आदी उपस्थित होते.

परजिल्ह्यांतून जिल्ह्यांत येणाऱ्या लोकांची प्रशासनाकडे दैनंदिन माहिती येत आहे. संबंधित तालुक्यांतील तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर दिली जात आहे. गाव पातळीवर लोकांना माहिती मिळावी असा त्यामागचा हेतू आहे. गावात येणाऱ्या लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यापेक्षा त्यांना होम क्वारंटाईन करण्याचा प्रशासनाचा अधिक प्रयत्न आहे. होम क्वारंटाईनचे नियम न पाळणाऱ्या लोकांवर आता यापुढील काळात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रामीण भागासाठी पहिल्यांदा व दुसऱ्यांदा अनुक्रमे पाचशे व एक हजार रूपये या प्रमाणे  दंड आकारला जाईल. तर शहरी भागांत एक हजार व तीन हजार रूपये दंड आकारला जाईल. याशिवाय तिसऱ्यांदा या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यात महिन्याला किती रुपयांची दारु विकली जाते जाणून घ्या

कोरोनाने नव्हे टंचाईनेही सुकतोय गळा...


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT