पश्चिम महाराष्ट्र

रेशनिंग दुकानदारांना बेजबाबदारपणाचा बसला झटका

सकाळ वृत्तसेवा

सातारा  :  सातारा जिल्ह्यात एकूण एक हजार सहाशे 79  स्वस्त धान्य दुकाने असून विविध स्वरुपाच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालयाने जिल्ह्यातील सव्वीस स्वस्त धान्य दुकांनावर कारवाई केली. त्यामधील अकरा दुकानदारांचे परवाने रद्द केले आहेत. तसेच सहा दुकानदारांचे परवाने निलंबित केले तर तीन दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली आहे. सहा दुकानदारांकडून धान्याच्या गैरव्यवहाराची बाजारभावाने भरपाई वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.

यामध्ये लाभार्थी यांना विहीत परिणामापेक्षा कमी धान्य देणे, जादा दर आकारणे. काही दुकानदारांनी ग्राहक यादीमध्ये नाव असतानाही धान्य देण्यास नकार दिला आहे, अंत्योदय व प्राधान्य कार्डवरील ऑनलाईन नोंद असणाऱ्या व्यक्ती संख्येपेक्षा कमी सदस्यांचे धान्य वितरण केल्याची प्रकरणेही पुढे आलेली आहेत.

याव्यतरिक्त विक्री साठा लेखे प्रत्यक्ष विक्री केलेल्या धान्याशी न जुळणे, दर्शनी भागात भावफलक व प्राप्त धान्य माहिती न लावणे, उध्दट वर्तणूक करणे, ग्राहक रजिस्टर अद्यावत न ठेवणे, लाभार्थ्यांना पावत्या न देणे इत्यादी बाबत पुरवठा विभागाकडील भरारी पथकामार्फत तपासणीच्यावेळी गैरप्रकार निर्दशनास आले आहेत. संवेदनशीलपणे व जबाबदारीने काम न करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर यापुढेही कार्यवाही  सुरुच राहणार आहे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते  यांनी सांगितले आहे. 

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सरकारचा हा निर्णय म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण : डॉ हमीद दाभोलकर

केशरी रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी 

देवस्थानांतील 75 लाख कोटींचे सोने ताब्यात घ्या : पृथ्वीराज चव्हाण 

रेशनिंग आणायला जाता ? मग आधी हे वाचा... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT