पश्चिम महाराष्ट्र

अतिरिक्त सचिवाने शेतकऱ्यावर राेखली रिव्हॉल्व्हर

सकाळ वृत्तसेवा

पाटण (जि.सातारा)  ः शेतात जाण्यासाठी असणारा रस्ता अडवून लाकडी दांडक्‍याने मारहाण करून डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिवशी बुद्रुक (ता. पाटण) येथील चार जणांविरोधात येथील पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. यापैकी एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, मुख्य संशयित भरत पाटील हा मंत्रालयात अतिरिक्त सचिव असून, तो पसार आहे. पांडुरंग विठ्ठल सूर्यवंशी (वय 58, रा. दिवशी बुद्रुक) यांनी याबाबतची फिर्याद येथील पोलिसात दिली.
 
पोलिसांची माहिती अशी, रविवारी (ता. 12) पांडुरंग सूर्यवंशी व त्यांचे चुलत भाऊ सदाशिव महादेव सूर्यवंशी सायंकाळी उभा पट्टा नावाच्या शिवारात गेले होते. त्या वेळी शेतातील रस्त्यात दगड लावून रस्ता बंद केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रस्ता अडवलेल्या ठिकाणी भरत सूर्यवंशी, त्याचा नातलग, एक अल्पवयीन मुलगा व एक अनोळखी व्यक्ती, तसेच जितेंद्र जयवंत सूर्यवंशी उभे होते. भरत पाटील यास पांडुरंग सूर्यवंशी यांनी रस्ता अडवल्याबाबतचे कारण विचारले असता, भरत आत्माराम पाटील व त्याच्या सोबतच्या अन्य तिघांनी पांडुरंग सूर्यवंशी यांना शिवीगाळ केली. भरत पाटील याने हातातील लाकडी दांडकाने फिर्यादी सूर्यवंशी यांच्या डोक्‍यावर मारहाण करण्याबरोबरच त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर काढून पांडुरंग सूर्यवंशींच्या डोक्‍याला लावून जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेची येथील पोलिसांत रविवारी रात्री उशिरा नोंद झाली. संशयित भरत पाटील यांच्यासाहित चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. या घटनेतील संशयित जितेंद्र जयवंत सूर्यवंशी यास अटक केली, तर मंत्रालयात अतिरिक्त सचिव असणारा भरत पाटील पसार झाला आहे. अन्य दोन संशयितांत एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या प्रकरणातील चौथा संशयित अनोळखी असल्याने पोलिस शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे तपास करत आहेत. 

महाराष्ट्रातील या अडचणी दूर व्हाव्यात; काँग्रेस समितीच्या टास्क फोर्सची मागणी 

लॉकडाउनचा काळ... आपल्या महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी... तरीही दुप्पट दरात मिळत आहे.

ग्राहकांच्या साेयीसाठी आणि महावितरणला मदत हाेईल अशा प्रकारे एकमेकांना साह्य करण्याची आत्ताच वेळ आहे. सविस्तर जाणून घ्या 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon: माॅन्सूनची अजून पाच दिवसांची प्रतीक्षा! राज्यात ७२ टक्के कमी पावसाची नोंद, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस

आजचे राशिभविष्य - 16 जून 2026

Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

16 जून 2026 पंचांग! चंद्रदर्शन, त्रिपुष्कर योग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

अस्थिबोध : गरम पाण्याची पिशवी की बर्फ?

SCROLL FOR NEXT