पश्चिम महाराष्ट्र

सरकारचा हा निर्णय म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण : डॉ हमीद दाभोलकर

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः पुणे मुंबई प्रमाणे सातारया मध्ये दारूची घरपोच विक्री अजिबात करू नये. दारूची दुकाने चालू झाल्याने समाजातील व्यसनाधिनतेचा प्रश्न पुन्हा वाढणार आहे अशा परिस्थितीत राज्य शासनाने दारू विक्रीचे कठोर नियंत्रण करणे अपेक्षित आहे. अशी मागणी परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थे मार्फत डॉ हमीद दाभोलकर यांनी केली आहे.

डाॅ. दाभाेलकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात लॉकडाऊनच्या कालखंडात दारूची दुकाने बंद असल्याने अनेक व्यसनाधिन व्यक्तींना व्यसनाच्या पासून दूर जाण्याची चांगली संधी मिळाली होती .परिवर्तन संस्थेमार्फत महाराष्ट्रातील १६८० व्यसनाधीन व्यक्तींचा टेलेफोन सर्व्हे करण्यात आला. त्यांच्यामध्ये टाळे बंदी नंतर व्यसनमुक्तीचे प्रमाण नेहमी पेक्षा पन्नास टक्के अधिक दिसून आले. ह्या मुळे अडचणींच्या कालखंडात पैशांची बचत आणि कौटुंबिक स्वास्थ्यात वाढ झाल्याचे देखील या सर्व्हेत निदर्शनास आले. अशा परिस्थितीत दारू घरपोच पोहचवणे म्हणजे लोकांच्यासाठी कौटुंबिक हिंसाचाराच्या पासून ते आर्थिक अडचणींच्या पर्यंत अनेक गोष्टी वाढवणे आहे. दारूची विक्री सुरु केल्याने व्यसन पुन्हा सुरु होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित करोनाच्या साथीने कोलमडले आहे. त्यामध्ये दारू वरती होणारा खर्च हा अनेक कुटुंबाना गरिबीच्या गर्तेत ढकलणार आहे. केवळ राज्याला आर्थिक दृष्ट्या परवडत नाही म्हणून दारूची दुकाने चालू करणे हा दीर्घमुदतीच्या सामाजिक तोट्याचा व्यवहार राज्य शासनाने करू नये अशी अपेक्षा देखील त्यांनी या वेळी व्यक्त केली आहे.

दारूची घरपोच विक्री करणे हे तर बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. दारू हि घरपोच विक्री करण्यासाठी काही जीवनावश्यक गोष्ट नाही. फिजिकल डीस्टनासिंग पाळून जर इतर साऱ्या गोष्टींची खरेदी समाज करत आहे तर केवळ मद्यप्रेमी ते पाळत नाहीत म्हणून त्यांना घरपोच दारू पोहचवणे हे दारूची सहज उपलब्धी आणि त्यामधून दारूचे व्यसन वाढवणारी गोष्ट आहे. यामधून अनेक कुटुंबाना अनेक त्रासांना सामोरे जावे लागेल.

केवळ महसुलाच्या मोहाच्यामुळे अशी घरपोच विक्री केली जावू नये अन्य जिल्ह्यांच्या मध्ये देखील सुरु केलेली अशी विक्री तातडीने थांबवण्यात यावी. या उलट दारू दुकान यांनी वेळ आणि संख्या कठोरपणे नियंत्रित करावी अशी देखील मागणी दाभाेलकर यांनी पत्रकात केली आहे. महाराष्ट्राच्या एकूण महसुलाच्या मधील दारूच्या विक्रीतून मिळणारा मह्सूल हा साधारण १५ टक्के आहे. या महसुलाच्या शिवाय देखील गुजरात आणि बिहार सारखी राज्ये नीट चालतात.राज्य शासनाने दारू विक्रीचे कठोर नियंत्रण करून शासनाच्या दारू महसुलाच्या वरील अवलंबित्व कमी करावे अशी देखील मागणी डाॅ. दाभाेलकर यांनी केली आहे. सातारा सातारा सातारा सातारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT