पश्चिम महाराष्ट्र

अचानक त्यांच्या डोळ्यासमोरच निम्मे घर कोसळले

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि.सातारा) : वादळात घरावरील पत्र्याचे छप्पर धडधड आवाज करायला लागल्यावर दोघी मायलेकी जीव मुठीत धरून आणि एकमेकींना आधार देत घरातीलच सुरक्षित वाटणाऱ्या खोलीत गेल्या. तिथे पोचताच अचानक डोळ्यासमोरच निम्मे घर कोसळले. मग, मात्र क्षणाचाही विलंब न करता वृद्ध आईला उचलून धाडसी लेक पुन्हा स्वयंपाक घरात धावली. लाकडे-विटा अंगावर, पायावर कोसळत असतानाही तिने सुरक्षित ठिकाणी घेतलेली ही धाव काळालाही मागे सरकायला लावणारी ठरली. मानेगाव (ता. पाटण) येथे घडलेला जीवन-मृत्यूचा हा थरारक पाठलाग त्या दोघींच्या तोंडून ऐकताना सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शनिवारी सायंकाळी या परिसरात वादळी पाऊस झाला. मानेगाव, काढणे व तारुख परिसरात वादळाचा जोर जास्त होता. तेथील अनेक घरांवरील पत्रे वादळात उडाले. मानेगाव येथील भगवान पांडुरंग माने यांच्या घरात वास्तव्याला असलेल्या त्यांच्या वृद्ध आई व बहिणीला तर "काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती,' याचीच प्रचिती यानिमित्ताने आली. भगवान माने व त्यांचे कुटुंबिय मुंबईस राहण्यास असतात. गावाकडे त्यांचे मोठे घर असून तेथे त्यांची आई श्रीमती यशोदा पांडुरंग माने (वय 85) आणि बहीण श्रीमती कांता नामदेव सावंत (वय 62) राहतात. श्रीमती यशोदा यांना मणक्‍याच्या दुखण्यामुळे चालता येत नाही. वळिवाच्या पावसाला सुरवात झाली तेव्हा दोघी मायलेकी घरात होत्या. वादळाने घरावरील पत्र्याचे छप्पर धडधड वाजायला लागल्यावर घाबरलेल्या कांताने आईला आधार देत घरात मध्यभागी असलेल्या खोलीत आणले. मात्र, त्याचक्षणी वादळाच्या तडाख्याने घरावरील छप्पर उडून दूरवर शेतात पडल्याचा आवाज कानावर येण्यास आणि डोळ्यासमोरच निम्मे घर कोसळण्यास एकच गाठ पडली. मग, मात्र दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरत वृद्ध आईला उचलून घेऊन ही धाडसी लेक पुन्हा स्वयंपाक घरात धावली. सुरक्षित ठिकाणी घेतलेली ही धाव अगदी चार फुटांवर आलेल्या काळालाही मागे सरकायला लावणारी ठरली. घर कोसळल्याने फर्निचर, साहित्य, धान्य व प्रापंचिक वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून या घटनेने त्या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.
 
घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींनाही धीर दिला. घरात साचलेले गुडघाभर पाणी उपसून काढण्यात आले. रात्री शेजाऱ्यांनी त्या दोघींना जेवण पोच केले. अंथरूण- पांघरूण भिजल्याने आणि घडलेला प्रसंग डोळ्यासमोरून हालत नसल्याने कालची रात्र जागून काढल्याचे मायलेकीने "सकाळ'ला सांगितले. 


काय सांगू बाबा, उभ्या जन्मात ज्ये पाह्यलं नव्हतं, ते काल बघितलं. आमचं काय खरं नव्हतं, पण नशिबानं दुघीबी वाचलुया. काळ आल्याला पण, येळ आली नव्हती म्हणत्यात ते काल कळलं 
श्रीमती यशोदा माने.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT