पश्चिम महाराष्ट्र

काहूर माजवून राहिला तरी कोडं उलगडनासं झालंय

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी जिल्हाधिकारी सातत्याने येथे बैठका घेताहेत. प्रशासन, पोलिस, आरोग्य विभागही आपापल्या परीने उपाययोजना राबवत आहेत. बाधितांच्या सहवासातील ज्येष्ठ नागरिक, महिला, मुला, मुलींसह त्यांच्या नातेवाइकांना, सहवासीतांनी तपासले जात आहेत, तरी कऱ्हाड तालुक्‍यात फैलावलेल्या कोरोनाची बाधा काही केल्या कमी येईना. प्रशासनाला याचे कोड उलगडनासे झाले आहे. त्यामुळे कऱ्हाडला लागलेले कोरोनाचे ग्रहण सुटणार कधी असा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात चिंतेचे काहूर माजवून राहिला आहे.
 
कऱ्हाड तालुक्‍यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण तांबव्यात सापडला. त्यानंतर त्याच्या संपर्कातील सर्व जण स्वतः तपासणीसाठी पुढे आले. तांबव्यावरील कोरोनाचे संकट टळले. संबंधित तरुण कोरोनामुक्त झाल्याने त्याला कृष्णा रुग्णालयातून नुकतेच घरी सोडण्यात आले आहे. यादरम्यान मुंबईवरून आलेला म्हारुगडेवाडीचा एक रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपाचार सुरू असतानाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका महिलेला त्याची लागण झाली. त्यानंतर चरेगाव आणि हजारमाचीतील रेल्वेचा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला. त्या तिघांवरही कृष्णा रुग्णालयात उपचार करून ते कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. ती साखळी म्हारुगडेवाडी, चरेगाव आणि हजारमाचीत वाढली नाही. मात्र, त्यानंतर नागपूरवरून आलेल्या बाबरमाचीतील रुग्णापासून सुरू झालेली कोरोनाची साखळी काही तुटायला तयार नाही. त्या रुग्णाच्या संपर्कातील वनवासमाची व मलकापूर-आगाशिवनगरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
 
एकट्या वनवासमाचीत कोरोनाबाधितांची संख्या आज 35 झाली आहे, तर मलकापूर- आगाशिवनगरातील बाधितांची संख्या 20 च्या वर पोचली आहे. त्यामुळे तालुक्‍याची चिंता अधिकाधिक वाढताना दिसत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बाधितांची संख्या एकट्या कऱ्हाडमध्ये असून, ती 72 झाली आहे. ही संख्या कमी व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह सातत्याने कऱ्हाडला बैठका घेऊन यंत्रणा अलर्ट करत आहेत. प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग तातडीने उपाययोजना राबवून कार्यवाही करत आहे. युद्धपातळीवर एवढ्या साऱ्या उपाययोजना करूनही कऱ्हाड तालुक्‍यात फैलावलेल्या कोरोनाची बाधा काही केल्या कमीच येईना. दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे प्रशासनालाही आता काय करायचे? याचं कोडं उलगडनासे झाले आहे. 

वनवासमाचीचे कोडे 

कऱ्हाड तालुक्‍यातील वनवासमाचीच्या बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुमारे अडीच हजार लोकवस्तीच्या या गावात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 35 वर पोचली आहे. एका रुग्णापासून सुरू झालेली साळखी 35 कुटुंबापर्यंत पोचली आहे. तेथील अनेकांना आतापर्यंत सहवासीत म्हणून तपासणीसाठी आणण्यात आले आहे. एकट्या गावातच बाधितांची संख्या वाढत असल्याने वनवासमाचीचे कोडंच उलगडनासं झाले आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यातील रुग्णसंख्या अशी 

कऱ्हाड तालुक्‍यात कोरोना बाधीतांची संख्या 72 झाली आहे. त्यात वनवासमाची 36, मलकापुर नऊ, आगाशिवनगर सहा, कऱ्हाड चार, साकुर्डी तीन, म्हारुगडेवाडी, कापील येथील प्रत्येकी दोन आणि सातारा, तांबवे, ओगलेवाडी, चरेगाव, बाबरमाची, रेठरे बुद्रुक, खोडशी, कासेगाव, कामेरी, उंब्रज, वहागाव येथील प्रत्येकी एक अशा 72 बाधीत रुग्णांचा समावेश आहे. त्यात पुरुष 44 आणि महिला 28 आहेत. त्यात वनवासमाचीतील नऊ, कापील येथील एक, साकुर्डी येथील एक आणि मलकापुर येथील एका मुलांचाही समावेश आहे.

प्रसूतीनंतर ती एकटीच चालत निघाली गावाकडे

जमीन वहिवाटीवरुन शेतकऱ्याचा खून; 17 जण अटकेत

धक्कादायक : वाढदिवसादिवशीच चौदा वर्षांची मुलगी कोरोनाबाधित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Gas Leak: पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती; २४ नागरिकांना त्रास, मोठा अनर्थ टळला!

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT