पश्चिम महाराष्ट्र

Video : जिल्हाधिकारी म्हणाले सातारकरहाे आता वेळ आलीय; पुणे मुंबईकरांनाही इशारा

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज आलेल्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे. तालुक्यात दोनवेळा दोन-दोन रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ठिकाणी प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणा पोचली असुन त्यांनी संबंधितांच्या संपर्कातील कुटुंबीय आणि अन्य काही जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

कऱ्हाड तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढु लागले आहे. तालुक्यात पहिला रुग्ण तांबवे येथे सापडला. त्यानंतर म्हारुगडेवाडी येथे मुंबईवरुन आलेला रुग्ण सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्य झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अन्य एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर हजारमाचीत रेल्वेचा कर्मचारी बाधीत म्हणुन सापडला. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच काल चरेगाव आणि बाबरमाची येथे दोन रुग्ण सापडले. तालुक्यात चार कोरोना बाधीत असल्याने तालुक्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच आज पुन्हा आणखी दोन रुग्ण सापडले आहेत.

त्यामुळे कऱ्हाड तालुका सध्या कोरोनासाठी हॉट बनत चला आहे. तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज आलेल्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे. आगाशिवनगर मधील संबंधित हा बाबरमाची येथील बाधीताच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर वनवासमाचीतील रुग्ण हा 38 वर्षाचा युवक आहे. संबंधित ठिकाणी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांच्यासह आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणा पोचली आहे. त्यांनी संबंधितांच्या संपर्कातील कुटुंबीय आणि अन्य काही जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

Coronavirus : लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बातमी; सरकारकडून तीन झोन घोषित

वृत्तपत्र वितरण बंदीचा पुनर्विचार करा : पृथ्वीराज चव्हाण

बिलीमाेरीया हायस्कूलला माेठी आग; पाचगणी,महाबळेश्वर, वाईतील अग्नीशमक दल दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT