पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडात कोरोनाचा राक्षस शंभरीच्या उंबरठ्यावर; चंचळीतला गुजरातहून परतल्यावर पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः म्हासोलीत सापडलेल्या कोरोना बाधीताच्या निटक सहवासातील दोघांना आणि मलकापुरच्या आगाशिवनगरातील नऊ वर्षाच्या मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन आज (रविवारी) स्पष्ट झाले. त्यामध्ये म्हासोलीतील ३१ वर्षाचा युवक आणि ६० वर्षाच्या जेष्ठ नागरीकाचा समावेश आहे. कऱ्हाड तालुक्यातील बाधीतांची संख्या वाढुन आज (रविवारी) ती ९३ झाली आहे. दरम्यान सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे गुजरात येथून प्रवास करुन आलेला एक रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने सातारा येथे देखील बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.
लाॅकडाऊन : धीर धरा आणि आशा कधीच सोडू नका !

कोरोनासाठी हॉटस्पॉट बनलेल्या कऱ्हाड तालुक्यात सोमवारपासुन (ता. ११) शुक्रवार पर्यंत (ता. १५) कोरोना बाधीतांची संख्या कमी झाली होती. पाच दिवसात एकही बाधीत सापडला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील बाधीतांची संख्या रोखण्यात आरोग्य यंत्रणेला आणि प्रशासनाला यश आले होते. दरम्यान पाच दिवसानंतर काल (शनिवारी) तालुक्यातील उंडाळे विभागातील म्हासोली येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यात नव्याने या रुग्णाची भर पडली आहे. त्यांच्या संपर्कातील तब्बल ५० जणांना तपासणीसाठी आरोग्य विभागाने हॉस्पीटलला दाखल केले होते.

त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये म्हासोलीतील ३१ वर्षाचा एक युवक आणि ६० वर्षांच्या एका जेष्ठ नागरीकाला कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातुन आज (रविवारी) स्पष्ट झाले. त्यामुळे तालुक्याची संख्या वाढुन आज (रविवारी) ती ९३ झाली आहे. 

दरम्यान आज म्हासोलीत पुन्हा दोन रुग्ण सापडल्याने तेथील साखळी वाढु लागल्याचे दिसत आहे. ती वेळीच रोखण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीकडुन आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले.

ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळीच विवाह झाला अन् नवदाम्पत्याने मंदिरातच... 

बंद म्हणजे बंद : पोलिस शेतकऱ्यांना मारतात, भाजी विक्रेत्यांना मारतात, त्यांच्या पिशव्या भरतात...

आई... कुठ कुठ शोधू मी तुला ?

कऱ्हाडला धोका कायम : म्हासोलीत कोरोनाचा रूग्ण आढळला


दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे गुजरात येथून (मूळचा चंचळी ता. काेरेगाव) प्रवास करुन आलेला एक व वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय कराड येथे कोरोनाबाधित रुग्णाचा एक निकट सहवासित तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे दाेन निकट सहवासित असे एकूण चार नागरिक कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 
सध्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 24, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे 10 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 30 असे एकूण 64  कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 62 रुग्ण लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित दोन रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.

25 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह 

सातारा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 2 आणि उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 5, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 18 संशयित रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले.

24 नागरिक विलगीकरण कक्षात

आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 24 (प्रवास करुन आलेले 23, श्वसनसंस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गाचे 1) नागरिकांनरा विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या 24 नागरिकांचे व कोरोनाबाधित 2 रुग्णांच्या  14 दिवसानंतरचे घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे  येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : काश्मीरहून दिल्लीला ३६ टन सफरचंद पाठवले जाणार

Manchar News : स्मार्ट मीटरमुळे गरीब शेतमजुरांवर लाखोंचे वीजबिल, आंबेगावात कुटुंब अंधारात

ST Reservation : बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षणासाठी अन्नत्याग उपोषण; भिलदरीत तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली

SCROLL FOR NEXT