police
police 
पश्चिम महाराष्ट्र

कऱहाडमध्ये गुन्ह्यांचा चढता आलेख कायम

सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा): तालुक्यातील क्राईम रेट वाढतानाच दिसतो आहे. वर्षभरात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची तुलना केल्यास तो क्राईम रेट रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठीही पोलिसांनी काही खास प्रयत्न मध्यंतरी केले आहेत. जनतेशी संपर्क वाढावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रमही त्यांनी राबवले आहेत. गर्दी, मारामारी, घरफोड्या, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यात गत वर्षापेक्षा तालुका आघाडीवर आहे. दारूबंदी करण्यासाठी पोलिस अग्रेसर राहिले आहेत. मात्र जुगावरील कारवाईत तालुका पोलिसांनी ढिल दिल्याचे दिसते. दरोड्यासह अनेक महत्वाचे गुन्हे पोलिसांच्या खात्यावर यशस्वी म्हणून नोंदवले असले तरी गुन्ह्याचा चढता आलेख मात्र कायम राहिला आहे.

तालुका पोलिस ठाण्यात वर्षभरात अनेक महत्वाचे गुन्हे घडले आहे. त्यात वडगाव हवेली येथील हवेत गोळीबार करून झालेला दरोडा, उंडाळे येथील युवकाचा मुंबई येथे झालेला खून, बनवडी येथील खून अशा अनेक महत्वाच्या घटनांच्या तपासात पोलिसांना यश आले आहे. अनेकदा अवघड गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांनी अन्य पोलिस ठाण्यांना सोबत घेवून तपास केल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांना महत्वाच्या गुन्ह्यात यश आले असले तरी अनेक सार्वजनिक गुन्ह्यात मात्र वाढ झाल्याचे दिसते. त्यात तालुक्यातील अनेक गावात मारामारीचे गुन्हे झाले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवता न आल्याने यंदा किमान ६४ गुन्हे अतिरिक्त दाखल झाले आहेत. तांत्रिकतेच्या मुद्देवार काही गुन्हे दाखल असले तरी काही गुन्ह्यामुळे त्या गावात जमावबंदी लागू केल्याच्या घटना आहेत. दरोड्याच्या गुन्ह्यात यश आले असले तरी मागील वर्षापेक्षा दोन दरोडे अधिक पडल्याचे यंदा दिसले. चोरीचे नऊ जास्त गुन्हे यंदा दाखल झाले आहेत. त्यात दिवसा घरफोडी आटोक्यात आली असली तर रात्रीच्या घरफोड्या वाढल्या आहेत. त्यात पन्नास हजाराहून अधिक रक्कम लंपास गुन्हे अद्यापही तपासावर आहेत. जबरी चोरीतही वाढ झाली आहे. त्याचे दोन जास्त गुन्हे यंदा दाखल आहेत. सदोष मनुष्य वधाचा एक गुन्हाही दाखल आहे.

तालुका पोलिसांकडे गतवर्षापेक्षा यंदा सुमारे २०० अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरीचे नऊ, आत्महत्याचे प्रयत्न सात, विनयभंगाचे नऊ, भाग पाचचे ४७, भाग सहाचे २ व तर अन्य सुमारे ६८ गुन्हे दाखल आहेत. दारूंबदीसाठी पोलिसांनी विशेष प्रय़त्न केल्याने यंदा सुमारे 128 लोकांवर त्यांनी कारवाई केली आहे. गतवर्षी पेक्षा यंदा ५९ जास्त गु्न्हे पोलिसात दाखल आहेत. मात्र पोलिसांना जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करताना हात आखडता घेतल्याचे दिसते. मागील वर्षी ३२ जुगार अड्ड्यांवर कारवाई झाली होती. ती यंदा 31 वरच थांबली आहे. भाग सहाच्या अन्य गुन्ह्याचा तपास पोलिसांनी केल्याने तेही सुमारे ३७ गु्न्हे घटले आहेत. पोलिसांची सार्वजनिक मारामारीवर कारवाई ढिली असल्याने तालुक्यातील क्राईम रेट मात्र वाढताना दिसतो आहे. त्यासाठी विषेश प्रयत्न होण्याची गरज आहे.

वाढ झालेले गुन्हे
                                          2016          2017

महिलांशी संबधित गुन्हे               27           38

मारामारी -                               10           41

शरीराविरूद्धचे गुन्हे -                   81           104

चोरी -                                     23            37

माल लंपास गुन्हे                       55            64

भाग पाचचे गुन्हे                        258          305

भाग सहाचे गुन्हे                        205          226

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT