file photo 
पश्चिम महाराष्ट्र

फलटणमध्ये डोक्यात दगड घालून एकाचा खून

संदीप कदम

फलटण (सातारा): नांदल (ता. फलटण) गावाच्या हद्दीत मिरगाव बाजूकडे पूर्वेला असलेल्या फॉरेस्टमध्ये डोक्यात दगड घालून एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. ही घटना दोन ते तीन दिवसापुर्वी झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आज (गुरुवार) सकाळी ही घटना उघडकीस आली.

या परिसरात प्रेत सडल्याने दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघडकीस आली. लोणंद पोलिस व फलटण ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. लोणंद-फलटण रस्त्यावरील मिरगाव नांदल गावचे हद्दीत असल्याची माहिती पोलिसांना समजताच फलटण ग्रामीणचे पोलिस निरिक्षक अशोक शेळके व लोणंदचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे व त्यांचे सहकाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. या अनोळखी व्यक्‍तिचा खून डोक्यात दगड घालून करण्यात आला आहे. फॉरेस्ट हद्दीतील परिसरात प्रंचड दुर्गंधी पसरल्याने पोलिस व ग्रामस्थांना ओळख पटवण्यासाठी अडचणी येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT