पश्चिम महाराष्ट्र

इथं नाकात कापूस भरायची वेळ आलीय अन्...नथीचा नखरा हाेताेय ट्रोल; युवतींचेही प्रत्युत्तर

जयंत पाटील

कोपर्डे हवेली : सध्या अॅन्ड्रॉईड मोबाईलचा जमाना अाहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयीन युवक, युवतीच्या हातात अॅन्ड्रॉईड मोबाईल हमखास दिसतोच.  रोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी आहे. त्यामुळे घर बसल्या बसल्या फावल्या वेळेत तरुणाईमध्ये व्हॉटसअपवर चॅलेंज  देण्याचा नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. यात पारंपरिक पोषख, गाॅगल घातलेला, बालपणीचा फोटो, सौंदर्य प्रसाधनाचा वापर न करता, स्माईल, नथ घातलेला (नथीचा नखरा) असे विविध प्रकारची छायाचित्रे व्हॉटसअप स्टेटसला ठेवण्याचे चॅलेंज दिले जाते. समोरच्या व्यक्तिने ते चॅलेंज स्विकारुन तशा प्रकारचे छायाचित्र स्टेटसला ठेवते. यात सध्या नथीच्या नखऱ्याची धुम पाहायला मिळत आहे.

तरुणाईमध्ये सध्या सोशल मीडियावरती चॅलेंज देण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यात युवतींसह महिला आघाडीवर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना दिलासा देण्यासाठी फिर मुस्कुराएगा इंडिया... फिर जीत जाएगा इंडिया...या गाण्याचे सिने कलाकारांकडून सादरीकरण केले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर हा चॅलेंजचा नवीन ट्रेंड सुरू झाला. फिर मुस्कुराएगा इंडिया या हॅशटॅग सोबत स्माईल केलेला फोटो स्टेटसला ठेवण्याचे चॅलेंज मित्र-मैत्रिणींना दिले गेले. त्यातून तरुणाईला या ट्रेंडची जणू भुरळ पडून तरुणाईत याची क्रेझ निर्माण झाली. हा नवीन ट्रेंड सुरू होताच काही तासांतच कीत्येक तरुण तरुणींच्या स्टेटसला फिर मुस्कुराएगा इंडिया या हॅशटॅग सोबत स्माईल केलेले छायाचित्र झळकायला लागले. फिर मुस्कुराएगा इंडिया नंतर अशा प्रकारच्या चॅलेंजचे जणू पेव फुटले. मित्र-मैत्रिणींना वेगवेगळ्या लुक मधील छायाचित्र स्टेटसला ठेवण्याचे चॅलेंज दिले जाऊ लागले. यात पारंपरिक पोशाख परिधान केलेले छायाचित्र, बालपणीचा फोटो, गॉगलवरील छायाचित्र, नथ घातलेले छायाचित्र (नथीचा नखरा) असे वेगवेगळे चॅलेंज देण्याचा आणि तो स्विकारण्याचा नवा ट्रेंड तयार झाला.

सोशल मीडियावर सुरू झालेल्या या ट्रेंडची सध्या तरुणाईत मोठी चर्चा आहे. या ट्रेंडमध्ये नथीच्या नखऱ्याला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नथीच्या नखऱ्याची धूम पहावयास मिळत आहे. नथीच्या नखऱ्यासाठी मुलींकडून त्यासाठी विशेष छायाचित्र काढल्याचे पहावयास मिळत आहे. नथीच्या नखऱ्यावरुन काही ठिकाणी मुलांकडून मुलींना ट्रोल देखील केले जात आहे. त्याला युवतींकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. या ट्रेंडवरुन वेगवेगळे विनोदही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

साेशल मीडियावरील नथीच्या नखऱ्याचे विनाेद....

इथं नाकात कापूस भरायची वेळ आलीय, आणि इकडे काय तर नथीचा नखरा...

नथीचा नखरा संपला असेल तर.... आधार कार्ड चा नखरा चालू करायचा का?

नथीचा नखरा झाला असेल तर नवऱ्या सोबत एक फोटो टाकून बळीचा बकरा हा चॅलेंज सुध्दा होऊन जाऊ द्या...

नखरा नथीचाच असतो आणि नखरे फक्त मुलींनीच करायचे असतात.... तर सांगायचं येवढच आहे की.... ज्यांना बघू वाटतंय त्यांनी बघायचं आणि ज्यांना बघवत नाही त्यांनी निघायचं...

नथीच्या नखऱ्यावर एवढे विरोध करतात असं वाटतं की विरोध करणाऱ्यांना कोणी चॅलेंज दिले नसेल.... त्यामुळे हा  राग स्टेट्स पोस्ट करुन व्यक्त करतात...

नथीच्या नखऱ्याला बरेच लोक नाव ठेवत आहेत. जगात काय चाललंय आणि यांचं काय चाललंय वगैरे पण दारुच्या दुकानाबाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या तेव्हा नाही लक्षात आलं जगात काय चाललंय ते आम्हा मुलींना महिलांना माहित आहे जगात काय चाललंय...


मला वेगवेगळ्या लुक मध्ये फोटो काढायचा छंद आहे. तो नेहमीच जोपासते. लॉकडाउनमध्ये सुरू झालेल्या या ट्रेंडमुळे माझ्या मैत्रिणींकडून वेगवेगळे छायाचित्र स्टेट्सला ठेवण्याचे चॅलेंज मिळू लागले. उपलब्ध छायाचित्रामुळे ते फोटो टॅग लाईन सोबत स्टेटसल ठेवण्याची जणू संधीच मिळाली. त्यामुळे काही प्रमाणात करमणूकही झाली.

ऐश्वर्या सिध्दार्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT