पश्चिम महाराष्ट्र

अवैध दारू वाहतूकप्रकरणी सचिन बेलागडेस अटक

सकाळ वृत्तसेवा

रहिमतपूर : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथून टकलेकडे (बोरगाव) जाणाऱ्या मार्गावर देशी व विदेशी दारूची अवैधपणे वाहतूक होत असल्याने पोलिसांनी काल रात्री छापा टाकला. त्यात तिघांना अटक करण्यात आली असून, 43 हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्यांसह ते वाहतूक करत असल्याचे आढळून आले होते. याबाबत पोलिस नाईक प्रवीण फडतरे यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, ता. 20 एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना रात्री साडेआठच्या सुमारास रहिमतपूर ते टकले बोरगाव (ता. कोरेगाव) जाणाऱ्या रोडवर विशाल सुधीर कारंजकर हा देशी- विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी ती पोलिस नाईक प्रवीण फडतरे, पोलिस हवालदार तानाजी माने, पोलिस नाईक शरद बेबले, नीलेश काटकर, पोलिस कॉन्स्टेबल विजय सावंत यांना दिली. त्यानुसार केलेल्या कारवाईत हिरो पॅशन मोटारसायकल (एमएच 11 बीबी 5522) वर विशाल सुधीर कारंजकर (वय 33) व तोफिक नजीर नदाफ (वय 23) (दोघेही रा. रोकडेश्वर गल्ली, रहिमतपूर) हे 43 हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या, तसेच दुचाकीसह आढळून आले. ही दारू त्यांनी सचिन बेलागडे (रा. रहिमतपूर) यांच्याकडून खरेदी केल्याचेही समोर आल्याने पोलिसांनी त्यासही अटक केली आहे. 

हे म्हणजे असं झालं...चार आण्याची काेंबडी अन् बारा आण्याचा मसाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT