पश्चिम महाराष्ट्र

पोलिसांना तांबडा रस्सा, मटणाचा वास आला अन्...

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि.सातारा)  : ग्रामदैवताच्या यात्रेनंतर बोकडांच्या मेजवानीने साजरी होणारी पाले जत्रा मेंढ (ता. पाटण) येथील गावकऱ्यांना मात्र भलतीच महागात पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असतानाही काल रात्री तेथे सुरू असलेल्या या यात्रेवर पोलिसांनी अचानक छापा टाकल्याने चुलींवर शिजणारे मटण तिथेच सोडून डोंगरातून सैरावैरा पळून जाण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. याप्रकरणी पोलिसांनी 21 जणांवर गुन्हा दाखल केला असून, तीन दुचाक्‍यांसह पातेली व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवताची यात्रा ग्रामस्थांनी रद्द केली असली, तरी काल जमावबंदीतही त्यांनी तेथे पाले जत्रेनिमित्त केलेले बोकडांच्या मेजवानीचे नियोजन त्यांच्याच अंगलट आले. या यात्रेसाठी स्थानिकांसह अन्यत्र पुनर्वसित झालेले काही धरणग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते. मंदिराच्या परिसरात दगडांच्या चुलींवर मटण व भात शिजत असल्याची व तेथे गर्दीही झाल्याची माहिती येथील पोलिसांना मिळताच रात्री साडेआठच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे व त्यांचे सहकारी नवनाथ कुंभार, अशोक खवळे, गृहरक्षक दलाचे डाकवे व पानवळ आदींनी अचानक तेथे छापा टाकला. पोलिसांना समोर पाहाताच नैवेद्य दाखवायच्या तयारीत असलेल्या लोकांनी डोंगरातून, तसेच नदीतून पळ काढला. काही जण पोलिसांच्या तावडीत सापडले. 

या वेळी सरपंच अमित पाटील, पोलिस पाटील भगवानराव मत्रे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी पातेल्यात शिजणारे मटण रस्सा, भात ओतून टाकला. पातेली, भांडी, तीन दुचाक्‍या आदी साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी 21 जणांवर विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल केला असून, अनेक जण अंधारात पसार झाल्याचे व त्यांचीही माहिती काढण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी संगितले. गुन्हा दाखल झालेल्यांना नंतर न्यायालयात हजर केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांनी येथे भेट देऊन याप्रकरणी माहिती घेतली व तपासकामी सूचना दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत. 

अडचणीतील मुख्यमंत्र्यांच्या मदतीला बाबा धावले

सातारा : जिल्हा परिषद शाळांत प्रवेश घ्या ऑनलाइन

CoronaVirus : बाप रे ! महाराष्ट्रात सातारा सोळाव्या क्रमांकावर

Breaking : अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे : शिवेंद्रसिंहराजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT