पश्चिम महाराष्ट्र

मोफत तांदळाचा भात शिजतोय कुठं ?

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाच्या महामारीला रोखताना सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात रेशनवरील वस्तू पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासन पेलत आहे. रेशनच्या धान्याचा होणारा काळाबाजार ऐन कोरोनाच्या महामारीतही संपलेला नाही. रेशनच्या गव्हाला आट्यासाठी मागणी वाढल्याने लाभार्थ्यांना टाळून तो आट्यासाठी विकण्याचा प्रकार होत आहे. तर मोफत तांदळाचा भात कोठे शिजतोय, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. पुरवठा विभागाने जिल्ह्यातील 17 रेशन दुकानांवर कारवाई करून आपण किती धुतळ्या तांदळासारखे आहोत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या साथीच्या काळामध्ये हा स्वस्तातील धान्याचा काळाबाजार कशासाठी, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 

कोरोना विषाणूशी मुकाबला करताना जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरोग्य विभाग झटतो आहेत. बाधित रुग्णांसोबतच संशयित रुग्णांचीही तेवढ्या तत्परतेने काळजी घेतली जात आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून स्वस्त धान्य आणि मोफत तांदूळ देण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या रेशन दुकानातून धान्याचे वितरण लाभार्थीनिहाय सुरू झालेले आहे. 20 मार्चपासून राज्यासह जिल्ह्यामध्ये लॉकडाउन सुरू असून, तीन मे पर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे जनतेला स्वस्तात धान्य देऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. सध्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वस्तात तांदूळ, गहू तसेच मोफत पाच किलो प्रति लाभार्थी तांदूळ दिला जात आहे. तर केशरी कार्डधारकांना गहू व तांदूळ स्वस्त पण विकत दिला जात आहे. कधी नव्हे ते रेशनवरील तांदूळ व गव्हाचा दर्जा उत्तम प्रकारचा असल्याने एरव्ही रेशनच्या दुकानाकडे न फिरणारेही धान्य घेण्यासाठी रांगेत दिसत आहेत. पण, या रेशनच्या तांदूळ व गव्हाला वाटप सुरू होताच पाय फुटले आहेत. गव्हाचा दर्जा चांगला असल्याने आटा बनविणाऱ्या काही कंपन्यांचे एजंट रेशन दुकानदारांशी संपर्क करून गव्हाची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे रेशनच्या गव्हाला आट्यासाठी मागणी वाढल्याची चर्चा आहे. तर रेशनच्या तांदळाचा भात कोणाच्या घरात शिजतोय, हे शोध घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाउनमुळे सर्व यंत्रणा कोरोना आणि त्यासंबंधित उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे अशा वेळी कोण तक्रार करणार आणि कोण दखल घेणार, हा प्रश्‍न आहे. 
 

कोरोनात तरी प्रामाणिकपणा दाखवा... 

पुरवठा विभागाने जिल्ह्यातील 17 रेशन दुकानांवर कारवाई केली. पण, दुकानदारांवर कारवाई करण्यापेक्षा तांदूळ आणि गव्हाचा काळाबाजार करण्यासाठी निर्माण झालेल्या यंत्रणेवर कारवाई करण्यासाठी पुरवठा विभागाचे हात का थरथरतात, हे गुलदस्त्यात आहे. किमान कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या काळात तरी रेशनवरील धान्याचा काळाबाजार न होता, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत किमान धान्य पोचावे, यासाठी पुरवठा विभाग व त्याच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. 

रेशनिंग आणायला जाता ? मग आधी हे वाचा...

खाल्ले तर सारेजण खाऊ...नाहीतर सगळेच उपाशी मरु 

Coronavirus : घरात बस भावा ! नाय तर साताऱ्यात रेड झाेनची हवा 

Video : आई तुझ लेकरु...मन हेलावणारी ही बातमी वाचाच 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT