पश्चिम महाराष्ट्र

कॉंग्रेस नेत्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप विषयी सेनेचे मंत्री म्हणाले....

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा कोणीही विपर्यास करू नये. मुख्यमंत्री कॉंग्रेसचा नाही, असे त्यांना म्हणायचे असावे, असा खुलासा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकताच माध्यमांशी बोलताना केला. रविवारी ता. 24 माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि एका व्यक्तीचा संवादाची ऑडिओ क्‍लीपच्या समाज माध्यमातून व्हायरल झाली हाेती. त्यावर आमदार चव्हाण यांनी वेट ऍण्ड वॉच अशी भुमिका मांडली हाेती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही माध्यमांशी बाेलताना आमदार चव्हाण यांच्या वक्तव्याचा कोणीही विपर्यास करू नये असे म्हटले आहे.

मी मंत्रिमंडळात नाही, सरकारपण आमचं नाहीये. शिवसेनेचे सरकार आहे, अशा आशयाच्या विधानाची माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची ऑडिओ क्‍लीप रविवारी ता.24 मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. पण, ती विदर्भातील एका व्यक्तीच्या आवाजातील क्‍लीप आहे. त्या क्‍लीपबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी वेट ऍण्ड वॉच, अशी प्रतिक्रिया देत त्याबाबत अधिक काहीही बोलणे टाळले.
  
मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी संबंधित वक्तव्य केल्याचा दावा त्या ऑडिओ क्‍लीपच्या माध्यमातून राजकीय पटलावरील अनेक नेत्यांसह पक्षाकडून होत आहे. ती ऑडिओ क्‍लीप सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. त्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात जोरादार चर्चा आहे. त्या व्हायरल ऑडिओ क्‍लिपमध्ये चव्हाण एका व्यक्तीशी बोलत आहेत असे जाणवते. काही कामानिमित्त व्यक्तीने फोन केला होता. त्याने निधीचा विषय काढला होता. त्यावेळी मी मंत्रिमंडळात नाही, सरकारही आमचं नाही. सरकार शिवसेनेचे आहे, असं विधान चव्हाण यांनी केल्याचे ऑडिओ क्‍लिपमधून स्पष्ट होत आहे. पुढे सरकारला शिफारस करतो, असेही आमदार चव्हाण यांनी त्यास म्हटले आहे. ऑडिओ क्‍लीप राजकीय वर्तुळात जोरदार फिरत आहे. मात्र, त्या व्हायरल ऑडिओ क्‍लिपबाबत आमदार चव्हाण यांनी अधिक माहिती घेणार असल्याचे स्पष्ट केले असून, आत्ताच त्यावर काहीही बोलणार नाही, अशी भूमिका घेतली हाेती. 

सरकार आमचं नाही; काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील माेठ्या नेत्याची क्लिप व्हायरल

दरम्यान आमदार चव्हाण यांच्या त्या व्हायरल होत असलेल्या आॅडीओ क्लीपबाबत चव्हाण म्हणाले, त्या आॅडीओ क्लीप बाबात फारसी माहिती घेतलेली नाही. ती माहिती घेत आहे. तो माझा आवाज आहे का याची खात्री करत आहोत. ती खात्री झाल्यानंतर त्यावर बोलेन मात्र राज्य सरकार चांगल काम करत आहे. याबद्दल शंका नाही.

पाच दिवसांतच माेहिम फत्ते..

चर्चाच चर्चा विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा : कॉंग्रेस नेत्याच्या कार्यकर्त्यास संधी मिळणार का ?

शेतकरी, मजुरांना सरकाराने पगार द्यावा माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणात सहा संचालकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT