पश्चिम महाराष्ट्र

Breaking : अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे : शिवेंद्रसिंहराजे

सकाळ वृत्तसेवा

सातारा : केंद्र सरकारने आजपासून देशभरातील सर्व दुकाने काही बंधने घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हॉटस्पॉट वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणची दुकाने स्थानिक परिस्थिती पाहून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने घ्यावा. या लॉकडाउनमध्ये गरजू लोकांना रोजीरोटी मिळण्यासाठी आणि रोढावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सकारात्मक निर्णय करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, छोटे- मोठे उद्योग आणि सर्व प्रकारची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी सुरू असून, कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी लॉकडाउन हाच सर्वोत्तम पर्याय आहे. आज केंद्र सरकारने कोरोनाचे हॉटस्पॉट वगळून इतर ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी सर्वप्रकारची दुकाने काही नियम व अटी घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात हॉटस्पॉट वगळून इतर सामान्य ठिकाणची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे.

ज्या ठिकाणची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. त्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर बंधनकारक करावा, तसेच गर्दी होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग असे नियम व अटी घालूनच अशी दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. हॉटस्पॉट वगळून इतर ठिकाणची दुकाने तेथील परिस्थिती पाहून सुरू करण्यास परवानगी द्यावी आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Video : जिल्हाधिकारी म्हणाले सातारकरहाे आता वेळ आलीय

Breaking : एसपी तेजस्वी सातपुते भडकल्या; म्हणाल्या तुम्हांला पश्चाताप हाेईल

हॅलाे...यांचे हे राेजचेच सुरु आहे...थकले आता मी...काय करु

CoronaVirus : बाप रे ! महाराष्ट्रात सातारा सोळाव्या क्रमांकावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT