Youth Dead Body Three days In Home 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक ः पोटच्या मुलाचा मृतदेह तीन दिवस घरातच ठेवला लपवून

सकाळ वृत्तसेवा

मेढा : जावली तालुक्यातील कंटेन्मेंट झोनमधून शुक्रवारी(ता. १५) म्हाते खुर्द गावाची मुक्तता झाली. मात्र, आज तेथील एका मुंबईकर कुटुंबाने आपल्याच मुलाचा तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू होऊन ही मृतदेह लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकिय यंत्रणा खडबडून जागी झाली असून संबंधित मुलाचा मृतदेह रात्री उशीरा क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. 

म्हातेखुर्द गावाची दोन दिवसांपूर्वी कंटेन्मेंट झोनमधून मुक्तता झाल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण आज येथील एका घराशेजारील ग्रामस्थांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी त्यांना बंद खोलीत अर्णव जयवंत दळवी (वय १६) हा मृतावस्थेत आढळला. मृतदेहामध्ये जंतू झाल्याने त्याची दूर्गंधी सुटली होती.

या घरामध्ये त्याचे आईवडील व भाऊ राहात होते. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू होऊनही या कुटुंबाने ही गोष्ट लपवून ठेवल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला. त्यानंतर तातडीने प्रशासकिय व आरोग्य यंत्रणा पोहोचली. त्यांनी संबंधित मुलाचा मृतदेह तपासणीसाठी मेढा व त्यानंतर सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात नेला. या घटनेबाबत गावासह तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे प्रशासकिय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली आहे. संबंधित मुलाचा मृतदेह रात्री उशीरा क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. 

म्हाते येथील युवकाचा आढळलेला मृतदेह २४ तासापेक्षा जास्त ७२ तासांपर्यंत झालेला असावा. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यात जंतू झाले होते. २४ तासापूर्वी मृत्यू झाल्याने नियमानुसार कोरोनाची टेस्ट घेता येत नाही. त्यामुळे सातारा ऐवजी मेढ्यात शवविच्‍छेदनासाठी मृतदेह आणला आहे, अशी माहिती जावली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते यांनी दिली. 

या प्रकारासंदर्भात म्हाते खुर्द गावच्या सरपंच व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा विमल दळवी म्हणाल्या, संबंधित कुटुंब लॉकडाऊनमध्ये प्रथमच त्यांच्या जीवनात गावाला आले असून आमच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा यांना माहिती देत नव्हते. मात्र, ग्रामस्थांना दुर्गंधी आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. घडलेला हा प्रकार दुर्दैवी असून विचार करायला लावणारा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT