पश्चिम महाराष्ट्र

गुड न्यूज : सातारा जिल्ह्यात तिघे कोरोनामुक्त; आज घरी परतणार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे दाखल असणाऱ्या तीन कोविड-19 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज (बुधवार) रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 20, स्वर्गीय. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 33, कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 1 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 1 असे एकूण 61 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे.
 

दरम्यान 28 एप्रिल रोजी उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 14 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी  पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 41 रुग्ण; कऱ्हाडत पाच तर फलटणला एक पाॅझिटिव्ह

WorldInternationalDanceDay : घुंगराचा नाद पुन्हा घुमवूच : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर

दरम्यान कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून   शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलेला असून यामुळे जिल्ह्यातील कायमस्वरुपी स्थायीक असणारे परंतु कामानिमित्त, नोकरीनिमित्त परराज्यांमध्ये अडकून असलेल्या मजूरांची माहिती 1077 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

जिल्ह्यातील जे मजूर परराज्यांमध्ये अडकलेले आहेत, अशा मजूरांबाबतची सविस्तर माहिती परराज्यात अडकेलेल्या मजूराचे नाव, मोबाईल क्रमांक, सध्या ज्या राज्यात राहत आहे तेथील संपूर्ण पत्ता, व्यवसाय याची माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

हेही वाचा - सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पाेलिसांवर हल्ले हाेत आहेत. या प्रकाराचा सातारकर साेशल मिडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करीत आहेत. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT