पश्चिम महाराष्ट्र

बंद म्हणजे बंद : पोलिस शेतकऱ्यांना मारतात, भाजी विक्रेत्यांना मारतात, त्यांच्या पिशव्या भरतात...

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हा प्रशासन आणि सातारा पोलिस दल यांच्या नाहक त्रासास कंटाळून सातारा शहरातील होलसेल भाजी विक्रेत्यांनी (आडत व्यापारी) उद्यापासून (सोमवार. 18) व्यापार बंद ठेवण्याची भुमिका घेतली आहे. याबाबत एका वृत्त वाहिनीशी बोलतना आडत असोसिएशनचे राजू गोरे म्हणाले कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पन्नास दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये सर्व आडत व्यापारांना वेळोवेळी जागा बदल केल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे. यामध्ये प्रशासनाला व पोलिसांना आणि मार्केट कमेटी यांनाही त्रास झाला आहे. श्रीमंत छत्रपती शाहू मार्केट यार्डमध्ये भुसार मार्केट प्रमाणे आम्हांला देखील होलसेल आडत व्यापार करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती शाहू मार्केट यार्डमधील आडत असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना नुकतीच केली आहे.
 
व्यापार करताना आम्ही सोशल डिस्टंन्सचा नियम पाळू, मास्कचा वापर करु , सॅनीटायझरचा वापर या गोष्टीची अंमलबजावणी करू. एक दिवस भाजी मार्केट व एक दिवस कांदा बटाटा व फळे अदलून बदलून तेथे होलसेल व्यापार मार्केट यार्ड मध्ये सकाळी पाच ते नऊ वेळेमध्ये व्यापार करतील. मार्केट यार्ड हे माहितीचे ठिकाण असल्याने शेतकरी बांधवांना येणे सोईस्कर होईल तसेच त्याच्या मालाला योग्य बाजार भाव मिळेल असेही निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच सातारा शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात भाजीपाला मिळेल.

दरम्यान सध्या प्रशासन आणि पोलिसांचा आम्हांला खूप त्रास होत आहे. यापुर्वी आम्हांला काही दिवस छत्रपती शाहू स्टेडियम येथे नेले. तेथे आम्हांला कोणत्याही प्रकारची सुविधा दिली नाही. तरीही आम्ही भाजी विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर काही दिवसांनी व्यवसाय बंद ठेवला. प्रांताधिकारी यांनी आम्हांला शहरातील काही भागात व्यवसायासाठी जागा निश्‍चित करुन दिल्या. परंतु त्या ठिकाणी आम्हांला पोलिस मारहाण करतात. त्यामुळे उद्यापासून आम्ही व्यवसाय बेमुदत बंद ठेवण्याच्या मनस्थितीत आलो आहोत.

सातारा शहराला 15 टन भाजीपाला पूरविला जातो. हा व्यवसाय बंद राहिला तर पुन्हा रस्त्यांवर भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी होईल असे गोरेंनी नमूद केले. ते म्हणाले पुण्यात, वाशी, कोल्हापूरला, सांगलीत मार्केट सुरु आहे, मग साताऱ्यातच बंद का केले जात आहे. आम्ही गेले दोन तीन दिवस शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारत आहोत. पण कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनामुळे शेतकऱ्यांची खूप मोठे नुकसान होत आहे. आम्ही छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल येथे व्यवसाय करण्यास तयार आहोत. तेथे आम्हांला जागा द्यावी असे गोरे यांनी नमूद केले. 

दरम्यान यावेळी गोरे यांचे सहकारी म्हणाले पोलिस आला की पहिल्यांदा त्यांच्या भाज्याचा पिशव्या भरतात आणि त्यानंतर त्यांची कार्यवाही सुरु होती. त्यामुळे आम्ही उद्यापासून (साेमवार) बेमुदत ठेवण्याचा निर्णयापर्यंत पाेचलाे आहाेत. 

सातारा : एकीकडे दिलासा तर दूसरीकडे धाकधूक

मुंबईकर म्हणतात शाळांत क्वारंटाइन नकाे रे बाबा

घरीच रहा सुरक्षित रहा ;शाळा प्रवेशाची काळजी करु नका. सविस्तर बातमी वाचा कधी हाेणार प्रक्रिया सुरु

गणपती बाप्पांच्या माध्यमातून चालून आलीय सुवर्णसंधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT