पश्चिम महाराष्ट्र

वाई तालुक्यातील ज्येष्ठ मुंबईत कोरोनाबाधित; कराडची साखळी तुटतातुटेना

सकाळ वृत्तसेवा

कवठे (जि. सातारा) : राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या वेळे गावातील (ता. वाई) 65 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे आज (साेमवार) स्पष्ट झाले. वाई तालुक्‍यातील हा पहिलाच कोरोनाबधित रुग्ण सापडल्याने तालुकावासियांची चिंता वाढली आहे. ही कोरोनाबाधित व्यक्ती मुंबईहून मार्च महिन्यात शेतीच्या कामासाठी वेळे येथे आली होती. 

गावी आल्यानंतर त्यांना थोडा थकवा जाणवू लागल्याने ते वेळेतील खासगी दवाखान्यात गेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर डिस्चार्ज घेऊन ही व्यक्ती चिंचनेर वंदन (ता. सातारा) येथे जाऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा सातारा येथील रुग्णालयामध्ये दाखल झाली. 

या व्यक्तीचे कुटुंबीय हे मुंबईला असल्याने त्यांची सेवा-सुश्रुषा व्यवस्थित व्हावी, यासाठी त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथून मुंबईला हलवण्यात आले. त्याबाबतची आवश्यक ती परवानगी बाधिताच्या कुटुंबाने घेतली होती. मुंबईला गेल्यानंतर त्यांची तब्येत खालावत गेली. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. 

याबाबतची माहिती कळताच तहसीलदार रणजित भोसले, भुईंजचे पोलिस उपनिरीक्षक श्‍याम बुवा, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे यांनी तत्काळ वेळे गावात धाव घेतली. कोरोनाबाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या चार लोकांना वाई येथील किसन वीर महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वेळे गावच्या परिघातील तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला. सात किलोमीटर अंतरातील परिसरही सील करण्यात येणार आहे. या परिसरात शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी कडक करण्यात आली आहे. 

वाई तालुक्यात कोणीही अद्याप पर्यन्त करोना बाधित नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप यादव यांनी सांगितले आहे. आज वेळे येथे तहसीलदार रणजित भोसले, भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक शाम बुवा,तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप यादव यांनी भेट दिली आहे.

एका चोरीची अजब चर्चा; पोलिसांसमोरही आव्हान

दरम्यान वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या एका नागरिकाचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 
 
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 4, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 14, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 21, कोरेगाव 3 असे एकूण 58 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 66, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे  75 व बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतर नमुने 10 असे एकूण 85, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 90, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 26 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव 26 असे एकूण 293 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपाणीसाठी पाठविण्यात आले आहे,  अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  गडीकर यांनी दिली आहे.  

थांबा! व्हॉट्‌सऍपवर पाेस्ट करण्यापुर्वी हे वाचा

प्रसूतीनंतर ती एकटीच चालत निघाली गावाकडे


Coronavirus वाचा : सातारा जिल्ह्यासाठीची गुड न्यूज

  • 4.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी
  •  1.    क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा    1843
  • 2.    कृष्णा हॉस्पीटल, कराड-    627
  • 3.    एकूण दाखल -    2470
  •     प्रवासी-308, निकट सहवासीत-1430, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-283,आरोग्य सेवक-378, ANC/CZ-71 एकूण= 2470
  • 4.    अनिर्णित नमुने-    7
  • 5.    14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-    40
  • 6     एकूण घेतलेले नमुने    47
  • 7.    कोरोना बाधित अहवाल -    80
  • 8.    कोरोना अबाधित अहवाल -    1927
  • 9.    अहवाल प्रलंबित -    463
  • 10.    डिस्चार्ज दिलेले-    1938
  • 11.    मृत्यू-    2
  • 12.    सद्यस्थितीत दाखल-    530
  • 13.    आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 3.5.2020) -    2461
  • 14.    होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -    2461
  • 15.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -    784
  • 16.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –    1677
  • 17.    संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-    274
  • 18.    आज दाखल    0
  • 19    यापैकी डिस्जार्ज केलेले-    187
  • 20.    यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-    0
  • 21.    अद्याप दाखल -    87

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आम्ही बंगालच्या जनतेचे अत्यंत ऋणी आहोत, ममता बॅनर्जींनी मानले मतदारांचे आभार

Satana Principal Felicitation: मुख्याध्यापक विनायक बच्छाव यांचे कार्य प्रेरणादायी, भावी पिढीसाठी आदर्श - ॲड. नितीन ठाकरे

Human-Leopard Conflict: कोटमदरा येथे मानवी-बिबट व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती कार्यशाळा

Mothers Day Event: एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या मदर्स डे सोहळ्यात ‘सुपर मॉम’ सन्मान

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

SCROLL FOR NEXT