Satara Zilla Parishad Ground Is In Horrible Condition 
पश्चिम महाराष्ट्र

झेडपी'चे मैदान पैशाच्या मोहापायी "बकाल'

सकाळ वृत्तसेवा

सातारा : मैदानाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेस पर्यावरणाचे आणि आरोग्याचे काहीही देणे-घेणे राहिले नसल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या मैदानावरील वृक्ष, वॉकिंग ट्रॅक तसेच अन्य मालमत्तेचे नुकसान होत आहे. काही मद्यपींनी याचा उपयोग "ओपन बार'सारखा करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मैदानावर व्यायामासाठी येणाऱ्या सातारकरांतून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीशेजारीच जिल्हा परिषदेच्या मालकीचे मैदान आहे. या मैदानावर वेगवेगळ्या शाळांची मुले सरावासाठी येतात तसेच अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक चालण्यासाठी सकाळी व संध्याकाळी येतात. मैदानातून आर्थिक उत्पन्नही मिळावे यासाठी ते विविध प्रदर्शने, महोत्सव, स्पर्धांसाठी भाड्याने दिले जाते. त्यासाठी दिवसाला 21 हजार रुपये भाडे आकारले जाते. यातून जिल्हा परिषदेला चांगली अर्थप्राप्ती होतेच त्यासोबतच सातारकरांचे मनोरंजन होते. परंतु, हे सर्व होताना दिवसेंदिवस या मैदानाची दुरवस्था होत चालली आहे. 

वाॉकिंग ट्रॅकची लागली वाट

मैदानाच्या कडेने चालण्यासाठी जिल्हा परिषदेने दहा लाख रुपये खर्च करून "वॉकिंग ट्रॅक' उभारलेला आहे. तसेच काही निसर्गप्रेमींनी या मैदानाच्या कडेने झाडेही लावली आहेत. एकीकडे नागरिक पर्यावरणपूरकता जपत असताना दुसरीकडे या मैदानाचा दुरुपयोगही वाढू लागला आहे. काही मद्यपी रात्रीच्यावेळी "ओपन बार'प्रमाणे याचा वापर करतात. जाताना खाण्यासाठी आणलेले पदार्थ व बाटल्या तिथेच टाकून जातात. महोत्सव व प्रदर्शन सुरू असताना येथील "वॉकिंग ट्रॅक'वरच वाहने पार्क केली जातात. त्यामुळे या "वॉकिंग ट्रॅक'ची दुरवस्था झाली असून, तो खडी "ट्रॅक' झाला आहे. या "ट्रॅक'च्या कडेने कॉंग्रेस गवत उगविले असून, प्रदर्शनातील शिल्लक अन्न हे या "ट्रॅक'च्या कडेने टाकले जाते. तसेच कचराही "ट्रॅक'च्या कडेने टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

झाडांची मोडतोड

काही पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमींनी लावलेल्या झाडांवरच शिल्लक राहिलेले अन्न व कचरा टाकला जातो. तर मोठ्या झालेल्या झाडांच्या फांद्याच तोडून टाकल्या आहेत. त्यामुळे मुलांप्रमाणे जपलेल्या या झाडांची मोडतोडही काही जणांकडून होत आहे. जिल्हा परिषदेने या मैदानाच्या स्वच्छतेसाठी समिती नेमून महोत्सव किंवा प्रदर्शन झाल्यावर संबंधितांकडून देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नाही. एकूण जिल्हा परिषद प्रशासनाचे या सर्व बाबींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे.

सध्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे क्रीडाप्रेमी आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानासमोरच हे जिल्हा परिषदेचे मैदान असूनही या मैदानाच्या दुरवस्थेकडे त्यांचे लक्ष जात नाही. त्यामुळे या मैदानाच्या वापराबाबत काही तरी नियमावली लागू करायला हवी. तरच या मैदानाची दुरवस्था होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बलाढ्य भाजपलाही दगाफटक्याची भीती; 'शिट्टीच्या' धसक्याने तब्बल 43 नगरसेवक अज्ञातस्थळी

DMart नव्हे, आता 'She Mart'! महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नेमकी योजना काय?

Pune Porsche Accident : मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाकडून पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील ३ आरोपींना जामीन मंजूर, कोर्टाची महत्वाची टिप्पणी

Horoscope Prediction 2026: नशीब बदलणार! 3 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत, कन्यासह ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु

Latest Marathi News Live Update: केडीएमसीत ठाकरे गटाच्या नॉटरिचेबल असलेल्या चार नगरसेवकांपैकी स्वप्नाली केणे घरी परतल्या

SCROLL FOR NEXT