Search Operation In Bhaskar Don Gang suspect In Kolhapur
Search Operation In Bhaskar Don Gang suspect In Kolhapur  
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरातील भास्कर डाॅन टोळीतील संशयिताच्या घराची झडती 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जवाहरनगरातील कुप्रसिद्ध भास्कर डॉन टोळीतील संशयित अमोल महादेव भास्करच्या घराची जुना राजवाडा पोलिसांनी झडती घेतली. बांधकाम व्यावसायिक अपहरण प्रकरणात वापरण्यात आलेली दोरी, काठीसह दोन मोटारसायकल व एक मोटार अशी वाहनेही जप्त केली. दाखल गुन्ह्यात आता पर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून संशयित पिंटू भास्करचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. 

जवाहरनगरातील भास्कर डॉन टोळीचा म्होरक्‍या संशयित अमोल भास्कर, त्याचा भाऊ व पिंटू भास्कर व त्यांच्या दोघा साथिदारांनी बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय मोरे यांचे लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केले. त्यानंतर त्यांना जवाहरनगरातील एका शेडमध्ये नेऊन बेदम माहाण केली होती. अशी फिर्याद 2 नोव्हेंबरला मोरे यांनी दिली होती. त्यानुसार संशयित अनिल त्याचा भाऊ पिटू भास्करसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी पोलिसांनी अमोल भास्करला अटक केली.

काल रात्री गणेश मकरंद कदम (वय 23) आणि जोतिराज अनिल भास्कर (वय 24) या दोघा संशयित साथिदारांनाही अटक केली. दरम्यान आज अमोल भास्करच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. त्याला बंदोबस्तात आज दुपारी जवाहरनगर येथील घरात नेण्यात आले होते. कारवाई दरम्यान मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती. हे विचारात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. 

कारवाईमध्ये घरातून गुन्ह्यात वापरलेली दोरी, काठीसह दोन मोटारसायकली व एक मोटार पोलिसांनी जप्त केली. दरम्यान अटक केलेल्या अमोलसह तिघांची पोलिस कोठडी उद्या (ता. 7) संपणार आहे. त्या तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील संशयित पिंटू ऊर्फ अमित भास्कर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा शोध स्वतंत्र पथकाकडून घेतला जात असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT