Kunku 
पश्चिम महाराष्ट्र

कुंकवाच्या गावामध्ये सध्या बघा कशाची आहे लगबग

सचिन बिचितकर

केम (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील केम येथे तयार होणाऱ्या कुंकवाला देशभरातून मागणी असते. सध्या संक्रांतीचा सण असल्याने येथील कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हळदी, कुंकू तयार करण्यासाठी कामगारांची लगबग सुरू आहे. हळदी, कुंकू तसेच काही कारखान्यांमध्ये रांगोळ्यांचे वेगवेगळे रंग तयार केले जातात. विशेषतः हळकुंडांपासून तयार केलेल्या कुंकवाला सर्वांत जास्त मागणी आहे.

केमच्या कुंकूला देशभरातून मागणी
या पारंपरिक व्यवसायाला सुमारे शंभर वर्षांची परंपरा आहे. गावाच्या भोवताली अनेक कारखाने असून, या कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या कुंकवाला वर्षभर तर मागणी असतेच, पण संक्रांत हा सण हळदी-कुंकवाचा असल्याने सध्या येथून कुंकवाची लक्षणीय निर्यात होत आहे. स्त्रियांच्या कपाळावरील कुंकू हे सौभाग्याचा अलंकार समजला जातो. संक्रांतीचा सण हा देशभरामध्ये महत्त्वाचा समजला जातो. हा सण मुख्यतः हळदी-कुंकवाचा सण म्हणून सगळीकडे ओळखला जातो. म्हणून केममध्ये तयार होणाऱ्या हळदी-कुंकवाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

मजुरांच्या हाताला मिळतेय काम
या कालावधीमध्ये इतर वेळेपेक्षा पाच ते सहा पटीने अधिक हळदी-कुंकवाचे उत्पादन येथील विविध कारखान्यांमध्ये घेतले जाते. त्यामुळे येथे पुरेसा मजूर वर्ग उपलब्ध असून, मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. उजनी जलाशयाच्या निळ्याशार पट्ट्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलेल्या केम या गावामध्ये हिरवीगार शेती व केमच्या अवतीभोवती वाळत असलेले हळदी-कुंकवाचे वाळवण यामुळे येथील भाग हा या दिवसामध्ये विविधरंगी होऊन गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT