Seekers ran to help 
पश्चिम महाराष्ट्र

साधक धावले मदतीला....

सचिन सातपुते

शेवगाव : रस्त्यावरील अपघातात, घरातल्या कमावत्या व्यक्तीच्या अकाली जाण्याने आर्थिक आधार हरवलेल्या कुटुंबाला शेवगाव येथील दत्त देवस्थान साधक समूहातर्फे एक लाख 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली. शहरातील आठरे कुटुंबावर गुदरलेल्या या अनपेक्षित संकटात तितक्‍याच अनपेक्षितपणे धावून आलेल्या साधक समूहाने आठरे कुटुंबाला समाजातील दातृत्वाची आणि सामाजिक जाणिवेची प्रचिती दिली. 

महिनाभरापूर्वी अपघातात निधन झालेल्या प्रवीण आत्माराम आठरे यांच्या पत्नी सोनाली यांना साधकांनी जमा केलेल्या रकमेची ठेवपावती दत्तजयंतीदिनी दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या हस्ते सुपूर्द केली. राक्षी येथील ढाकणे पॉलिटेक्‍निक कॉलेजमधील ग्रंथपाल व शहरातील दादाजी वैशंपायननगर येथील श्री दत्त देवस्थानामधील सेवाभावी कार्यकर्ते प्रवीण आठरे यांचे मागील महिन्यात शेवगाव- नगर रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडल्याने निधन झाले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, बहीण, दोन वर्षांची मुलगी, असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झालेले असल्याने, आता अचानक प्रवीण यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरवला. कमावत्या व्यक्तीच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

ही बाब येथील श्री दत्त देवस्थानातील साधकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्र येत एक लाख 25 हजार रुपये मदत जमा केली. ती रक्कम पत्नी सोनाली आठरे यांच्या नावावर ठेव म्हणून ठेवण्यात आली. त्याची ठेवपावती दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या हस्ते सोनाली यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन फडके, सचिव फुलचंद रोकडे, लक्ष्मण काळे, संजय फडके, बाबूशेठ जोशी, बापूसाहेब गवळी, जगन्नाथ गोसावी, दिलीप फलके, निवृत्ती गोरे, भगवान धूत, जनार्दन हरके, मनीष बाहेती, शोभा फडके आदी उपस्थित होते. 

साधकवर्ग मदत करणार 
साधक परिवारातील एका कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. ही उणीव कोणालाही भरून काढता येणार नाही. मात्र, कुटुंबीयांना धीर देण्याबरोबरच आर्थिक आधार देण्यासाठी दादाजी वैशंपायन यांच्या सर्व साधकांनी मदत केली. कोलमडलेल्या कुटुंबाला पुन्हा सावरण्यासाठी साधकवर्ग यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करील. 
- गिरीश साठे, उद्योजक पुणे 

दु:खातून सावरण्यासाठी आधार 
पतीच्या निधनाची उणीव भरून निघणे अशक्‍य आहे; परंतु कुटुंबाच्या दु:खाच्या काळामध्ये दत्त देवस्थानामधील साधकवर्गाने धीर देत केलेली आर्थिक मदत कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला उपयोगी पडेल. त्यापेक्षा, अशा कठीण प्रसंगातही साधकवर्गामुळे कोणी तरी आपल्या पाठीशी भक्कम उभे असल्याची जाणीव झाली. 
- सोनाली आठरे, प्रवीण आठरे यांच्या पत्नी  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT