udayanraje 
पश्चिम महाराष्ट्र

एका खुन प्रकरणाने निकाल बदलला अन् उदयनराजे पराभूत झाले

सकाळ डिजिटल टीम

सातारा : 1999 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्यासमोर खुद्द शिवेंद्रराजेंचे वडील आणि उदयनराजेंचे काका अभयसिंहराजे यांचे आव्हान होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला सातारा नगरपालिकेतील अभयसिंहराजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. त्यात मुख्य आरोपी म्हणून उदयनराजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् उदयनराजे भोसले यांना अटक झाली. या प्रकरणाचा गंभीर परिणाम लोकांच्या मतांवर झाला आणि विधानसभा निवडणुकीत उदयनराजेंना पराभवाला सामोरे जावे लागले.

राष्ट्रवादीनेच केला होता उदयनराजेंचा दोन वेळा पराभव

पुढे उदयनराजेंची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणानंतर सातारा नगरपालिकेची निवडणूक उदयनराजे मोठ्या फरकानं जिंकले आणि राजकारणात स्थिरावले. सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील उदयनराजे हे मोठे राजकीय नेतृत्व म्हणून त्या काळापासून समोर आले. त्यानंतर त्यांनी मोठ्या मताधिक्याने 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. सोबतच नुकत्याच झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. 

मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात दिलेला शब्द पाळला

दरम्यान, उदयनराजे आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षाच्या गोटात सामील झाले आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याने सातारा लोकसभा मतदारसंघातील लोकांना पुन्हा निवडणुकीला समोरे जावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेसाठी अखेर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले; दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहणार

SCROLL FOR NEXT