shegaon golibar prakaran 
पश्चिम महाराष्ट्र

शेगाव गोळीबारातील चार आरोपींचा जामीन नाकारला 

तात्या लांडगे

सोलापूर : बैल पोळ्याच्या (कर्नाटकी बेंदूर) मानपानावरून चुलत भाऊ पिंटू ऊर्फ अण्णाराव बाबूराव पाटील याने महादेव ऊर्फ सुरेश अण्णाराव पाटील यांच्यावर शेगाव (ता. अक्‍कलकोट) येथे गोळीबार केला. त्यामध्ये महादेव पाटील यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात एकूण 12 आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल असून त्यापैकी सहा आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केले होते. त्यापैकी हणमंत पाटील, जगदेव पाटील, मोरत्याप्पा पाटील, रमेश पाटील यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. 


शेगाव गोळीबार प्रकरणातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना जामीन मिळाल्यास साक्षीदारांच्या जीवितास धोका असून तपासात अडथळा येण्याची शक्‍यता आहे. घटनेच्या दिवशीचे सीसीटिव्ही फुटेजही मिळवायचे असल्याचा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी न्यायालयासमोर केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांचा जामीन फेटाळला. तर चिदानंद बिराजदार, श्रीधर कोळी यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. फताटे यांनी काम पाहिले. 


ऑनलाइन फसवणुकी प्रकरणी 
राजस्थानच्या बाप-लेकीस पोलिस कोठडी 

सोलापूर, ता. 10 : क्राउंडफिंच सायबर नेटीक्‍स प्रायव्हेट लिमिटेड, जयपूर या कंपनीचे मालक मनिषकुमार नरेंद्रपाल कक्‍कर व नरेंद्रपाल पृथ्वीराज कक्‍कर यांनी विश्‍वासात घेऊन स्वराज्य पे डॉट कॉम या नावाने डोमेन देवून सोलापुरातील सुनील शिवाजी पवार (रा. हनुमान नगर, भवानी पेठ) यांची सात लाख 99 हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी आरोपींना न्यायदंडाधिकारी एम. एम. बावरे यांनी 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
ऑनलाइन लाईटबील, मोबाईल व डिश रिचार्ज, विमा पेमेंट, पोस्टपेड बिल, लॅण्डलाईन फोन बिलद्वारे स्वराज्य पे डॉट कॉमवर पैशाचा भरणा केला. परंतु, आरोपींनी ती रक्‍कम संबंधित विभागास न भरता स्वत:कडेच ठेवली, अशी फिर्याद श्री. पवार यांनी जोडभावी पोलिसांत दिली. त्यानुसार 9 जानेवारीला पोलिसांना आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी ठोठावली. या प्रकरणात सरकारतर्फे ऍड. एस. डी. देवमाने यांनी तर आरोपीतर्फे ऍड. अभिषेक गुंड यांनी काम पाहिले. 


बचत गटाच्या पैशावरून जीवे मारण्याचा प्रयत्न 
बचत गटाच्या पैशाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून दगडाने, हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची फिर्याद पद्मावती अशोक पासकंटी (रा. कलावतीनगर, एमआयडीसी अक्‍कलकोट रोड) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे. सरोजिनी व्हरकेरी यांच्या घरासमोरील रोडवर ही घटना घडली असून या मारहाणीत मुलगा किसन याच्या फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार नागमणी आमंची, संजीव अलकुंटे, लक्ष्मण अलकुंटे, देवू अलकुंटे, शिवराज पवार व त्यांच्यासमवेत आलेल्या दोन अनोळखी मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Loal: मध्य आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार, कर्जत-कसाराहून थेट वाशी-बेलापूर गाठता येणार; लोकल कधीपासून सुरू होणार?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक, विष प्राशन करत दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न; उपचार सुरू

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Mumbai News: मेट्रोमुळे 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीचा महसूल बुडाला

SCROLL FOR NEXT