Shekhar Singh 
पश्चिम महाराष्ट्र

व्‍वा... शेखर सिंहांचा पहिल्‍याच दिवशी धडाका

सकाळ वृत्तसेवा

सातारा : पदभार स्वीकारताच नवे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पहिल्याच दिवशी कामांचा धडाका लावला. स्वाइन फ्लूसह त्यांनी आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला, तर सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

श्री. सिंह यांचे मुंबईहून आज दुपारी साडेचारच्या सुमारास साताऱ्यात आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात थोडा वेळ थांबल्यानंतर ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले व त्यांनी पदभार स्वीकारला. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मावळत्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी त्यांचे स्वागत केले. 

पदभार स्वीकारल्यानंतर श्री. सिंह यांनी श्‍वेता सिंघल यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील नेमक्‍या परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर श्री. सिंह यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, कीर्ती नलावडे, संगीता चौगुले, अश्विनी जिरंगे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते, साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

प्रारंभी त्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी स्वाइन फ्लू साथीच्या स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांची ओळख करून घेत महसूलसह नियोजन विभागाचा आढावा घेतला. 

प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांतील व्यसनाधीनता कमी करून त्यांच्यात जागृती करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्याच्या शाश्‍वत विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी तुम्हा सर्वांची मदत घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सिंधुदुर्गला असताना मी पर्यटक म्हणून साताऱ्यात येत होतो. येथील कास परिसराची भुरळ मला पडली होती. आता तर येथे काम करण्याची संधी मिळाली असून, सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना प्राधान्य दिले जाईल. यामध्ये पायाभूत सुविधांसह आरोग्य, शिक्षण यासोबतच इतर बाबींवर भर देणार आहे.

शेखर सिंह, जिल्‍हाधिकारी, सातारा

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 75,000 पार, Suzlon फोकसमध्ये; पाहा महत्त्वाचे अपडेट्स

Nanded: दीड महिन्यापासून भाऊ कोमात, उपचारसाठी पैसे घेऊन निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू; लेक पोरकी, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Chandrapur: घरात गांजाचा साठा; चंद्रपुरात तरुण अटकेत; मातंग मोहल्ल्यात पोलिसांचा छापा; १ किलो गांजा जप्त

Ujani Dam: उजनी धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव; ‘सुपर एल निनो’मुळे पाऊस लांबणीवर, धरण उणे २१ टक्के, निर्णय राज्य शासनाच्या हाती

Chandrapur: ऑफ-ग्रीड सोलर प्रणाली सुरू करा; अंगणवाडीतील स्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांत संताप

SCROLL FOR NEXT