Shirala NCP MLA Mansingrao Naik supports Sharad Pawar Group esakal
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटलांचे कट्टर समर्थक मानसिंगरावांचा कोणाला पाठिंबा, साहेब की दादा? 'या' बैठकीला उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण

मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांच्या भूमिकेबाबत गेले काही दिवस सातत्याने वावड्या उठत होत्या.

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार यांनी शिरूर, कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती.

मुंबई, सांगली : शिराळ्याचे आमदार तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांच्या भूमिकेबाबत गेले काही दिवस सातत्याने वावड्या उठत होत्या. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला उपस्थिती लावत आपण मोठ्या साहेबांसोबतच असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, मानसिंगरावांच्या भूमिकेबाबत मुंबईच्या पातळीवर अनेक चर्चा होत्या. त्यामुळे मानसिंगरावांशी संवाद साधायला माध्यम प्रतिनिधी उत्सुक होते. त्यांना चकवा देत मानसिंगराव बाहेर पडले. त्याचीही दिवसभर चर्चा होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर युद्ध जोरात सुरू झाले आहे. एकीकडे कायदेशीर पातळीवर लढाई सुरू असताना आता आकड्यांत कोण बलवान, हा कळीचा मुद्दा चर्चेला आला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेबाबत मात्र गेले काही दिवस सतत चर्चा सुरू होती.

त्यातच एका वृत्तवाहिनीने ‘शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या यादीत मानसिंग नाईक यांचे नाव नाही’, असे वृत्त दिल्याने खळबळ उडाली होती. त्यावर मानसिंगरावांनी त्यावेळीही ‘मी शरद पवारांसोबतच’,असे जाहीर केले होते.

कोल्हापूर येथील शरद पवारांच्या सभेला ते उपस्थित होते. आजच्या बैठकीला मानसिंगरावांच्या उपस्थितीने अनेक शंकांचे निरसन झाले, मात्र ते माध्यमांना चकवा देऊन गेल्याने त्याची फारच चर्चा रंगली.

शरद पवार यांनी शिरूर, कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीला त्या-त्या मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष फ्रंटचे पदाधिकारी उपस्थित होते.

हातकणंगले मतदारसंघातून प्रतीक यांना उमेदवारी द्यावी

  1. हातकणंगले लोकसभा मतदार संघाबाबत बैठकीत जोरदार खल झाला.

  2. राष्ट्रवादीने आतापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पराभवासाठी रान उठवले होते, मात्र त्यांना यश आले नाही.

  3. गेल्यावेळी शिवसेनेने शेट्टींचा पराभव केला.

  4. यावेळी महायुतीविरुद्ध शेट्टी विरुद्ध राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाल्यास फायदा होईल.

  5. प्रतीक जयंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास येथे विजय खेचून आणता येईल, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT