Governor Bhagat Singh Koshyari esakal
पश्चिम महाराष्ट्र

'राज्यपाल जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

'राज्यपाल जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही.'

सोलापूर : जुळे-सोलापुरात (Solapur) सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या विवेकानंद केंद्र वेदांतिक अ‍ॅप्लिकेशन ऑफ योग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट (वि. के. वयम) या वास्तूचं उद्घाटन आज शुक्रवारी (४ मार्च) सकाळी साडेअकरा वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते होत आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त विधान केल्यामुळं राज्यपाल कोश्यारी यांचा हा दौरा रोखण्याचा इशारा महाविकास आघाडीसह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. याच पार्श्वभूमीवर आज राज्यपालांविरोधांत शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. दरम्यान, पोलिसांनी शिवसैनिकांना (Shiv Sena) रोखण्याचा प्रयत्न केलाय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) निगडित विवेकानंद केंद्राच्या १२ हजार चौरस फुटांच्या तीन मजली वास्तूचं लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते होत आहे. विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष ए. बालकृष्णन यांची या वेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या निमित्तानं होणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांच्या सोलापूर दौऱ्याला तीव्र विरोध करीत महाविकास आघाडीनं आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याची पहायला मिळत असून राज्यपाल जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांना जुळे मार्गावर घेतलाय.

भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले?

“चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT