Shiv Sena rebel in district planning 
पश्चिम महाराष्ट्र

"जिल्हा नियोजन'मध्ये शिवसेनेतील बंडाळी चव्हाट्यावर 

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी महापालिका गटातील तीन जागांसाठी अर्ज भरलेल्या 18 पैकी 13 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यात सर्वसाधारण महिला प्रवर्गात एक जागा बिनविरोध झाली. नगरपालिकेच्या एका जागेसाठी सहापैकी पाच जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगरपालिकेची एक जागा बिनविरोध झाली.

महापालिकेतील दोन जागांसाठी सर्वसाधारण, नागरिकांचा मागास अशा दोन प्रवर्गात प्रत्येकी दोन उमेदवार राहिल्याने सरळ लढत होणार आहे. जिल्हा परिषदेची एक जागा याआधीच बिनविरोध झाली आहे. रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी उद्या (मंगळवारी) प्रसिद्ध होणार आहे. 24 डिसेंबरला मतदान आणि 26 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 

हेही वाचा बंगल्यासाठी साईबाबांकडे प्रार्थना करा 

जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी महापालिकेच्या तीन जागांसाठी 18, नगरपालिकेच्या एका जागेसाठी सहा, जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाला होता. महापालिकेतील 68 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे काम पाहत आहेत. 

हे उमेदवार झाले बिनविरोध 
जिल्हा परिषद (सर्वसाधारण) - धनराज गाडे 
महापालिका (सर्वसाधारण महिला) - आशा कराळे 
नगरपालिका (सर्वसाधारण) - गणेश भोस 

यांनी घेतली माघार 
महापालिका ः सुभाष लोंढे, सागर बोरुडे, सुनील त्र्यंबके, मनोज कोतकर, अविनाश घुले, मनोज दुलम, संजय चोपडा, ज्योती गाडे, संध्या पवार, रूपाली वारे, रिजवाना शेख, सुनीता कोतकर, सोनाली चितळे. नगरपालिका ः शहाजी खेतमाळीस, आसाराम खेंडके, मंदार पहाडे, सूर्यकांत भुजाडी, रमेश लाढाणे. 

यांच्यात होणार लढत 
अमोल येवले विरुद्ध अनिल शिंदे 
विनित पाऊलबुधे विरुद्ध सुवर्णा जाधव 

शिवसेनेचे नियोजन कोलमडले 
महापालिकेच्या एका जागेसाठी अमोल येवले विरुद्ध अनिल शिंदे हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर उभे राहिले. अनिल शिंदे यांच्यासाठी "राष्ट्रवादी'च्या उमेदवारांनी माघार घेतली. मात्र, शिवसेनेच्याच उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे शिवसेनेची अंतर्गत बंडाळी यानिमित्ताने पुढे आली आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे नियोजन कोलमडलेले दिसत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या आशा कराळे बिनविरोध झाल्याने भाजप यशस्वी ठरला आहे. शिवसेनेच्या अंतर्गत कुरघोडीला विधानसभा निवडणुकीतील राजी-नाराजीचेच कारण असल्याची चर्चा रंगली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naxalites Support Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'वोटचोरी'च्या आरोपांना नक्षलवाद्यांचाही पाठिंबा...११ पानी पत्रक जारी करत दिलं समर्थन!

Maharashtra Govt Jobs : भूमिअभिलेख विभागात ९०५ पदांची भरती, राज्य सरकारची मान्यता

Sunday Morning Breakfast : रविवारी ब्रेकफास्टला बनवा कुरकुरीत बीटचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

क्रिकेट द्वंद्व ऐरणीवर

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

SCROLL FOR NEXT