shirala politcs esakal
पश्चिम महाराष्ट्र

चर्चा तर होणारच; राष्ट्रवादीत एंट्रीआधीच कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर

दिग्गजांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

दिग्गजांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शिराळा : येथील प्राध्यापक कॉलनी येथे विविध गल्ल्यांच्या नामफलकाच्या उद्घाटनास पक्ष प्रवेशापूर्वीच माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक व आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नाईक यांच्या मनो मिलनाने शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांच्या राष्ट्रवादी (NCP) पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. (BJP)

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, ‘‘शिराळा येथील तोरणा ओढ्याच्या सौंदर्य वाढीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील (Jayant Patil) यांनी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. भुईकोट किल्ल्यावर संभाजी महाराजांच्या होणाऱ्या स्मारकाचा आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. चांदोली पर्यटन, संभाजी महाराज स्मारक यामुळे शिराळचे नाव प्रयत्नाच्या नकाशावर ठळक दिसले पाहिजे. शिराळा विस्ताराची सुरवात प्राध्यापक कॉलनीने केल्याने शिराळ्याला (Shirala) शहराचा दर्जा मिळाला. या शहराला विविध कामांसाठी १५ कोटींचा निधी आणला आहे.

रणधीर नाईक म्हणाले, ‘‘शिराळा येथील महत्त्वाच्या असणाऱ्या अडचणी दूर होत आल्या आहेत. शिराळा बंटी पाटील मित्र परिवार व नगरपंचायतीच्या पदाधिकारी यांनी प्रयत्न करून प्राध्यापक कॉलनी येथील प्रत्येक गल्लीमध्ये नामकरण फलक लावण्यासाठी पुढकार घेतला. शिराळा तालुक्याला अनेक वेळा उपाध्यक्षपद मिळाले. परंतु अनेक वर्षांनी चेअरमनपद आमदार मानसिंगराव नाईक यांना मिळाले आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील शेतकरी व इतर संस्थांच्या विकासाला त्यांचा मोलाचा हातभार लागेल. प्रारंभी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मानसिंगराव नाईक व सांगली जिल्हा युवक अध्यक्षपदी विराज नाईक यांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला.

घन:श्याम आवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज नाईक, माजी पंचायत समिती सभापती भगतसिंग नाईक, नगराध्यक्ष प्रतीभा पवार, नगरसेवक गौतम पोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, विश्वासचे संचालक विश्वास कदम, यशवंत निकम, विश्वप्रतापसिह नाईक, पृथ्वीसिंग नाईक , विजयकुमार जोखे, बंटी पाटील, प्रा. सतीश माने, माजी नगराध्यक्ष सुनीता निकम, नेहा सूर्यवंशी, सुजाता इंगवले, सीमा कदम, संजय हिरवडेकर, दस्तगीर अत्तार, अजय जाधव, संजय जाधव, राजू निकम, बसवेश्वर शेटे उपस्थित होते. रफिक आत्तार यांनी आभार मानले, सूत्रसंचालन ॲड. विलास झोळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT