Shivkumar elected on Karnataka Congress President
Shivkumar elected on Karnataka Congress President 
पश्चिम महाराष्ट्र

मध्यप्रदेशातील धक्यानंतर क्रर्नाटकात कॉंग्रेसने उचलले हे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : काही महिन्यांच्या विलंबानंतर अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने बुधवारी माजी जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली. दरम्यान, सिद्धरामय्या यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद आणि कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपद कायम करण्यात आले आहे. 

मध्यप्रदेशात पक्षाला जोरदार धक्का बसल्यामुळे हायकमांडने तातडीने कर्नाटकातील पक्ष पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेसला शिवकुमार यांच्यासारखे प्रभावी नेते गमवायचे नव्हते. दरम्यान, के.पी.सी.सी. कार्यकारी अध्यक्षपदी आमदार ईश्वर खंड्रे, सतीश जरकीहोळी आणि सलीम अहमद अशा तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिन्ही कार्यकारी अध्यक्ष सिद्धारमय्या यांचे निकटवर्तीय आहेत. 

डी. के. शिवकुमार यांचे निकटवर्तीय आमदार नारायणस्वामी यांची विधानपरिषदेत व माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांचे पुत्र जेवरगीचे आमदार अजय सिंह यांची विधानसभेत मुख्य प्रतोद (चीफ व्हीप) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
माध्यमांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, "सक्रिय समर्थन केल्याबद्दल कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले. के.पी.सी.सी. अध्यक्षपदी नेमणूक असूनही आपण मनापासून पक्षाचे कार्यकर्ते राहू. मी पक्षात नम्र कार्यकर्ता म्हणून मोठा झालो आहे. बऱ्याच लोकांनी माझ्यावर खोटे आरोप लावले. खोटे खटले दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला पक्षाध्यक्ष बनविण्यास उद्युक्त केले. सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनी माझे समर्थन केले. सोनिया गांधी यांनी मला ही मोठी जबाबदारी सोपविली आहे. 1985 मध्ये जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा राजीव गांधींनी मला ओळखले आणि विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले. मी आत्तापर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्याच्या रूपात कठोर परिश्रम केले आहेत. तरीही मी अद्याप एक पक्ष कार्यकर्ताच आहे.' 

केपीसीसी अध्यक्षपदासाठी शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात चुरस होती. 2018 मध्ये सिद्धरामय्या निष्ठावंत दिनेश गुंडूराव यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. यावेळीही सिद्धरामय्या यांचा आपल्या समर्थकांचीच अध्यक्षपदी निवड व्हावी असा प्रयत्न होता. मात्र, डी. के. शिवकुमार यांच्यासारख्या निष्ठावंतांकडे हायकमांड दुर्लक्ष करू शकत नाही, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. विखुरलेल्या कॉंग्रेसमधील सर्व गटांना शांत आणण्यासाठी सतीश जारकीहोळी, ईश्वर खंड्रे आणि सलीम अहमद यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानीनंतर पक्षाला नव्या नेतृत्वाची आवश्‍यकता होती. डिसेंबर 2019 च्या पोटनिवडणुकीत पक्षाला मोठा पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून कॉंग्रेस विधिमंडळ पक्षप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. केपीसीसीचे तत्कालीन अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनीही 9 डिसेंबर 2019 रोजी प्रदेशाध्यपदाचा राजीनामा दिला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT