Mhaisal, Kagwad ESakal
पश्चिम महाराष्ट्र

म्हैसाळ-कागवाडात शिवसैनिक आक्रमक ; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

शिवपुतळा विटंबनेचा निषेध ः मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

सकाळ वृत्तसेवा

मांजरी, (कागवाड) : बंगळूर (Bengalur) येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यांची विटंबना केली आहे. त्या निषेधार्थ कर्नाटक (Karnataka) सीमेवर म्हैसाळ-कागवाड (Mhaisal, Kagwad)दरम्यान म्हैशाळ येथे मिरज (Miraj) शिवसेनेकडून बुधवारी (ता. २२) जोरदार आंदोलन करण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai)यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह कर्नाटकच्या ध्वजाची होळी करण्यात आली. या घटनेमुळे येथे काहीकाळ तणाव झाल्याने पोलिसांनी बंदोबस्त् ठेवला होता.

बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर मिरज, कोल्हापूर, पुणे येथे शिवसेनेने जोरदार आंदोलन केले होते. यावेळी मिरजेत शिवसेनेकडून कर्नाटकातील वाहनांची तोडफोड केली होती. नंतर कर्नाटकातही कर्नाटक रक्षणा वेदिकेकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मिरजमधील संतप्त शिवसैनिक बुधवारी (ता. २२) म्हैशाळ-कागवाड सीमेवर सकाळपासून जमले. त्यांनी कर्नाटक सीमेवर म्हैशाळ-कागवाड दरम्यान आंदोलन केले. यावेळी निषेधाच्या घोषणा देऊन विटंबना प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह कर्नाटकच्या ध्वजाची होळी करण्यात आली. यावेळी मिरज शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन्ही राज्यांच्या सीमेवर बंदोबस्त

शिवसेना कार्यकर्त्यांनी म्हैशाळ-कागवाड सीमेवर आंदोलन छेडल्याने अनुचित प्रकार न घडण्यासाठी दोन्ही राज्यांच्या सीमेवर बंदोबस्त ठेवला होता. मिरज शहरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी महाराष्ट्राच्या हद्दीत पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तर अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीष, उपनिरीक्षक रबकवी यांच्याकडून कर्नाटक सीमेवर बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT