पश्चिम महाराष्ट्र

शिवरायांच्या अवमानप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र माेदींनीच माफी मागावी : डॉ. भारत पाटणकर

सकाळ वृत्तसेवा

सातारा : आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोर अवमान झाला आहे. याबद्दल पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेची माफी मागावी, हा आग्रह धरण्यासाठी सहा फेब्रुवारीला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील जनतेचा आग्रह मोर्चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली आहे.
 
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात डॉ. पाटणकर यांनी म्हटले, की केंद्राने नागरिक ठरविण्याच्या मोहिमेमुळे सध्या जनतेला प्रचंड असुरक्षित परिस्थितीत ढकलले आहे. ही मोहीम अनावश्‍यक असून, पिढ्यान्‌पिढ्या देशात राहून देश घडविण्याचे कार्य करणाऱ्या जनतेच्या नागरिकत्वाची तपासणी करणे जनतेचा उपमर्द करणारे असल्यामुळे केंद्र सरकारनेही तपासणी कायमची रद्द करावी, तसेच आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकात केलेल्या तुलनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोर अवमान झाला आहे.

हे पुस्तक मागे घेतल्याचे समजते; पण त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागावी, तसेच या पुस्तकाचे प्रकाशन पक्षाच्या कार्यालयात झाल्यामुळे भारतीय जनता पक्षानेही माफी मागावी, या दोन्ही गोष्टींचा आग्रह धरण्यासाठी हा मोर्चा असेल. हा मोर्चा राजवाडा येथून निघून पोलिस मुख्यालय मार्गे पोवई नाक्‍यावर येईल, तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे.

हेही वाचा - एकीला पुढे,दूसरीला मागे असे चालत नाही;पवारांची मिश्किल टिप्पणी

हेही वाचा -  सातारा : युवकाचा खून; अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अवश्य वाचा - शिवेंद्रसिंहराजेंनी उठवला अजित पवारांपूढे जाेरदार आवाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT