पश्चिम महाराष्ट्र

कल्याणोत्सवाने नटराज रथोत्सवाची सांगता

सकाळ वृत्तसेवा

सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील देवदेवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा आज कल्याणोत्सवाने समाप्त झाला. पाच ते दहा जानेवारीदरम्यान शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
 
कांची कामकोटी पीठाचे जगद्‌गुरू शंकराचार्य महास्वामी श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांच्या व महास्वामी श्री श्री जयेंद्र सरस्वती यांच्या कृपेने व परमपूज्य श्री श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या आशीर्वादाने हा सोहळा होत असताना आज पहाटे 5 ते 12 या वेळेत श्री गणपती होम, चतुर्वेद पारायण होऊन पुणे येथील श्री राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टच्या वतीने श्री नटराज व शिवकामसुंदरी देवीस महाभिषेक करण्यात आला. या देवांचा लग्न सोहळा अर्थात कल्याणोत्सवाला शेकडो भाविक उपस्थित होते.

जरुर वाचा -  साताऱ्यात रंगणार सकाळ स्कूल क्रिकेट लीग
 
यावेळी नटराज मूर्तीस विविध फळांचा, भस्म, चंदन, अत्तर, दूध, दही, मध, साखर, तूप आदींचा अभिषेक घालण्यात आला. शिवकामिनी देवी (पार्वती) व आनंद नटराज यांचा कल्याणोत्सव होऊन या दोन्ही मूर्तींना वस्त्र, अलंकार, फुलांचे हार, लिंबाची माळ, चंदन हार आदींनी शृंगार करून या मूर्ती गाभाऱ्यात नेऊन महाआरती करण्यात आली.

त्यानंतर पारायण समाप्ती होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आले. शेकडो भाविकांनी रांगा लावून प्रसाद घेतला. या रथोत्सवाच्या कार्यक्रमास सातारकर भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुढील महिन्यात होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाला असाच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त रमेश शानभाग यांनी केले.

हेही वाचा - Video : काळूबाईच्या नावानं चांगभलंने दुमदुमला मांढरगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारूने मृत्यूआधी दृष्टी अधू झाली, तोंडाला फेस आला; आतापर्यंत २१ मृत्यू, २२ अधिकाऱ्यांचे निलंबन

Ebola Virus: इबोला व्हायरसचा उद्रेक! ९०० हून अधिक जणांना संसर्ग, २२३ रुग्णांचा मृत्यू; नवीन स्ट्रेन किती धोकादायक?

Mumbai: ब्रेकऐवजी एक्सिलरेटरवर पाय, कारखाली चिरडून महिलेसह चिमुकल्याचा मृत्यू; मुंबईत भीषण अपघात

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

IPL 2026 : शतक केलं, GT ला फायनलमध्येही नेलं अन् मग शुभमन गिलनं आई-वडिलांना मैदानातच मारली कडकडून मिठी; Video Viral

SCROLL FOR NEXT