पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरः रमणमळ्यात सहा मोटारसायकली पेटवल्या 

राजेश मोरे

कोल्हापूर - रमणमळा येथे रस्त्यावर उभ्या केलेल्या सहा मोटारसायकली अनोळखी व्यक्तीने पेटवल्या. हा प्रकार मध्यरात्री घडला. परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र त्यात तीन मोटारसायकली जळून खाक तर इतर मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती, रमणमळा येथे सोनुले कुटुंब राहते. सुनील लक्ष्मण सोनुले यांनी वर्षभरापूर्वीच नवी मोपेड खरेदी केली आहे. त्यांच्या या नव्या मोपेडसह रोहीत सुभाष सोनुले, सुभाष सोनुले, रेखा कुमार सोनुले आणि अशोक यशवंत सोनुले अशा सहा जणांच्या मोटारसायकली घरासमोरील रस्याच्या बाजूला उभ्या केल्या होत्या. दरम्यान मध्यरात्री दोनच्या सुमारास या मोटारसायकली अनोळखी व्यक्तीने पेटवल्या. ही आगीची घटना येथील अविनाश शेलार यांच्या लक्षात आली. त्यांनी सोनुले कुटुंबासह शेजाऱ्यांना जागे केले. त्यांनी घरातील पाणी वापरून वाहनांना लागलेली आग आटोक्‍यात आणली. मात्र यातील तीन वाहने जळून खाक झाली. इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाले. वाहनाजवळ रॉकेलचे बोळे सापडले असून अनोळखी व्यक्तीने हे कृत्य केले आहे.

या घटनेची माहिती सोनुले कुटुंबाने शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सकाळी पोलिस निरीक्षक संजय मोरेसह नगरसेवक राजाराम गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT