solapur-dcc 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा बॅंकेला मिळणार 879 कोटी !

तात्या लांडगे
सोलापूर : सरसकट कर्जमाफीच्या आशेने सोलापूर जिल्हा बॅंकेच्या 75 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांनी दीड लाखांच्या कर्जमाफीकडे पाठ फिरवली. बॅंकेच्या 879 कोटींच्या थकबाकी वसुलीचा कृती कार्यक्रम तयार करूनही थकबाकीदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे बॅंकेने आता थकबाकी अन्‌ येणेबाकीची आकडेमोड सुरू केली असून सरसकट कर्जमाफीतून सोलापूर जिल्हा बॅंकेला 879 कोटी रुपये मिळतील, अशी माहिती बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी दिली.

हेही वाचाच...ठरलं... कर्जमाफीची कट ऑफ डेट 31 ऑगस्ट !

मागील वर्षीचा दुष्काळ, शेतमालांचे गडगडलेले दर, एकरकमी एफआरपीची प्रतीक्षा अन्‌ खासगी सावकारांचे डोक्‍यावरील कर्ज अशा विविध कारणांमुळे तत्कालीन युती सरकारने दीड लाखांची कर्जमाफी देऊनही बहुतांश शेतकरी त्या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत. त्यातच महापूर, अतिवृष्टी, अवकाळीमुळे बळिराजापुढील अडचणीत वाढ झाली. तत्पूर्वी, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची सरसकट कर्जमाफीची मागणी अन्‌ सत्ताधाऱ्यांची सात-बारा कोरा करण्याच्या घोषणांमुळे बळिराजाला सरसकट कर्जमाफीची आशा लागली. त्यांनी थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवल्याने बॅंकेने वसुलीचे केलेले नियोजन कोलमडले. वाढलेल्या थकबाकीमुळे संचालक मंडळ बरखास्त झालेल्या सोलापूर जिल्हा बॅंकेवर प्रशासकाची नियुक्‍ती झाली. तरीही शेती कर्जाची वसुली ठप्पच राहिली. त्यामुळे आर्थिक अडचणीतील जिल्हा बॅंकेकडे नव्या कर्जवाटपासाठी पुरेसा पैसाच शिल्लक नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर बॅंकेने आकडेमोड सुरू केली असून सरसकट कर्जमाफीतून सुमारे 900 कोटी रुपये मिळतील, असे चित्र आहे.

हेही वाचाच...'जीपीएस'द्वारे धावणार सोलापुरची परिवहन बस

-
सोलापूरची स्थिती
एकूण विकास सोसायट्या
1,264
शेती कर्जाची येणेबाकी
1,287 कोटी
शेतीची थकबाकी
879 कोटी
थकबाकीदार शेतकरी
75,600


हेही वाचाच...पोलिस पाटील भेटणार नुतन मुख्यमंत्र्यांना


सरसकट कर्जमाफीच्या आशेने वसुली होईना
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची सद्यःस्थितीत शेती कर्जाची एक हजार 287 कोटींची येणेबाकी असून 874 कोटींची थकबाकी आहे. वाढलेल्या शेती कर्जाच्या थकबाकीमुळे जिल्ह्यातील एक हजार 364 विकास सोसायट्यांची अवस्थाही बिकट झाली असून वसुलीचे नियोजन करूनही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाल्यास बॅंकेला 900 कोटींपर्यंत रक्‍कम मिळेल.
- शैलेश कोथमिरे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahad Chavdartale : 'कागदावर नको, प्रत्यक्ष काम दाखवा'; महाडच्या चवदार तळ्याची पाहणी करत आनंदराज आंबेडकरांचा प्रशासनाला इशारा

Jalna News: इंधन पुरवठा विस्कळित, ३७ पेट्रोल पंप बंद वाहनचालकांची गैरसोय ; साखळीत व्यत्यय आल्याने उद्भवली परिस्थिती

Mumbai: दादर स्थानकाबाहेर धक्कादायक प्रकार! इडली विक्रेत्याकडून पदार्थांसाठी शौचालयाच्या पाण्याचा वापर, व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

मालिकेतील वडिलांनीच खऱ्या आयुष्यात केलेलं मिताली मयेकरचं कन्यादान; म्हणाले, 'मला मुलं नाहीत पण...'

SCROLL FOR NEXT