पश्चिम महाराष्ट्र

` या ` शहरातील 157 थकबाकीदार झळकणार डिजीटल फलकांवर

सकाळ वृत्तसेवा

 सोलापूर : मिळकत कराची एक लाख व त्यापुढे थकबाकी असलेल्यांची नावे डिजीटल फलकावर झळकणार आहेत. सुमारे 157 थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. ते ज्या भागात राहतात त्या भागात त्यांचे नाव व थकीत रक्कम डिजीटल फलकावर लिहण्यात येणार आहे. 

धाडसी कारवाईची गरज
शहराच्या काही भागातील मिळकतदार कर भरण्यास टाळाटाळ करतात. त्याची रक्कम खूप वाढते. महापालिकेने धडक मोहिम सुरु केली की मग हे लखपती थकबाकीदार एकतर नगरसेवकांचा दबाव आणतात किंवा पाच ते दहा हजार रुपये भरून कारवाई टाळतात. काही मिळकतदारांकडे 25 ते 30 हजार रुपये थकबाकी असली तरी महापालिकेचे कर्मचारी त्या मिळकतदाराचे नळजोड तोडतात, जंगम मालमत्ता जप्त करतात, त्याचवेळी या लखपती थकबाकीदारांबाबत मात्र धाडसी कारवाई होत नाही. 

157 जणांकडे एक ते पाच लाखांपर्यंतची थकबाकी
शहरातील 157 मिळकतदारांकडे एक ते पाच लाखांपर्यंतची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. या थकबाकीदारांच्या नावाचे डिजीटल फलक ते रहात असलेल्या परिसरात लावण्यात येणार आहेत. त्यावर थकीत रकमेचाही उल्लेख केला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने फलक लावण्यात आले होते. त्यावेळी अल्पावधीतच कोट्यवधी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. 

थकबाकीदारांसाठी अभय योजनेचा प्रस्ताव 
शहरातील थकबाकीदार मिळकतदारांसाठी अभय योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. मिळकतदारांकडे सुमारे 228 कोटी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेच्या नोटीसांना मिळकतदार दाद देत नाहीत, त्यामुळे थकबाकीची रक्कम वारंवार वाढू लागली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आयुक्त दीपक तावरे यांनी अभय योजनेचा प्रस्ताव ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Orders: 5 कोटींमध्ये संपला दशकभराचा वाद! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मुंबईतील फ्लॅटही सोडावा लागणार

Monsoon Rain Formation : 'मॉन्सून'चा पाऊस ढगांत कसा तयार होतो? पावसाचे रहस्य उलगडले; हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे आता होणार अधिक सोपे

Maharashtra Pilgrims Accident : तीर्थयात्रा ठरली अखेरची! महाराष्ट्राच्या भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; २ ठार, ३५ जखमी

Nanded News: जिल्ह्यात सव्वा लाख मेट्रिक टन खतसाठा; खरीप हंगामासाठी मुबलक साठा; तुटवडा भासणार नाही

Rohit Pawar: पार्थ पवार यांच्या विधानाबद्दल रोहित पवारांची दिलगिरी; आगामी कालावधीत सर्वांनी एकत्र येणे गरजेच!

SCROLL FOR NEXT