केगावमधील पॅराडाईज हॉटेलमध्ये डान्सबार!
केगावमधील पॅराडाईज हॉटेलमध्ये डान्सबार! 
पश्चिम महाराष्ट्र

केगावमधील पॅराडाईज हॉटेलमध्ये डान्सबार!

सकाळवृत्तसेवा

फौजदार चावडी पोलिसांचा छापा: चालकासह नऊ बारबालांना अटक

सोलापूर : केगाव परिसरातील हॉटेल पॅराडाईजमध्ये ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारवर फौजदार चावडी पोलिसांनी छापा टाकला. चालक सचिन जाधव, रोहित राहुल गायकवाड, वाद्य वाजविणारे किशोर अर्जुन बासपोर, जय मोतीलाल हलदार या चौघांसह नऊ बारबालांना अटक करण्यात आली आहे.

रविवारी (ता. 18) पहाटे अडीचच्या सुमारास फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलिस निरीक्षक शहाजी पवार आणि त्यांच्या पथकाने हा छापा टाकला. हॉटेल पॅराडाईजमधील ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला तोडके-मोडके कपडे घालून अश्‍लील नृत्य करून ग्राहकांना आकर्षित करीत असल्याचे दिसून आले. रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बारमध्ये नृत्य करण्यास बंदी असतानाही स्वतः:च्या आर्थिक फायद्यासाठी नृत्य करताना नऊ महिला सापडल्या. चालक सचिन जाधव हा पोलिसांना पाहून पळून गेला. तो नंतर पोलिसांना शरण आला. विना परवाना बार चालू ठेवून शासनाने ठरवून दिलेल्या वेळेच्या बंधनाचे उल्लंघन केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस नाईक निशिकांत नागनाथ जोंधळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक शहाजी पवार तपास करीत आहेत.

बाकीच्या डान्सबार कारवाई केव्हा?
हॉटेल पॅराडाईजमध्ये कधीपासून डान्सबार चालू होता हे माहिती नाही, माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या आदेशानंतर छापा टाकल्याचे पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांनी सांगितले. पुणे रस्ता, बाळे परिसर आणि केगाव परिसरात अनेक ठिकाणी गुपगुपपणे डान्सबार चालू आहेत. डान्सबारकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांकडून बाकीच्या डान्सबारवर केव्हा कारवाई होणार असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT