मंगलवेढा : जुने कोर्ट, आरोग्य विभाग, नगरपालिका मुख्य रस्त्यावर पाण्याने तळ्याचे झालेली रूप.
मंगलवेढा : जुने कोर्ट, आरोग्य विभाग, नगरपालिका मुख्य रस्त्यावर पाण्याने तळ्याचे झालेली रूप. 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपले

दावल इनामदार

ब्रह्मपुरी (सोलापूर): रोहिणी नक्षत्राच्या परतीच्या मुसळधार पावसाने मंगळवेढा शहर व ग्रामीण भागाला मंगळवारी (ता. 11) रात्री चांगले झोडपले. नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. रात्रभर विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले होते.

मंगलवेढा शहरातील जुने कोर्ट, तालुका वैद्यकीय अधिकारी ऑफिस, नगरपालिका लहान मुला मुलांची शाळा नं.१,२, नगरपालिका आदि शासकीय कार्यालयात पाणी शिरले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, महात्मा गांधी पुतळा, प्रांत कार्यालय समोर पाणी साचल्यामुळे सर्वांना पाण्यातून रस्ता शोधावा लागत होता. झाडे कोलमडून पडली होती. तालुक्यात अनेक वर्षातून पहिल्यांदाच मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी पेरणीसाठी वापशाच्या प्रतीक्षेत आहे.

शहरातील अनेक जोडणारे रस्ते रात्रभर मुसळधार पावसामुळे बंद होते. त्यामुळे दुस-या दिवशी शाळेतील मुलांचा रस्ते बंद झाले होते. रस्ते असुन अडचण नसून खोळांबा झाले होते पाण्यामुळे दुस-या दिवशीही कार्यालये असलेल्या रस्त्यावर जवळपास पाच फुट पाणी या सखल भागात पाणी भरपूर साचले होते. काही ठिकाणी तुंबलेल्या गटारांमुळे दुकानात पाणी शिरले होते.

रस्ते, गटारांचे बांधकाम करताना पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी तुंबूनच राहिले. आत्तापर्यंत झालेल्या विकासकामांची पण तिच ओरड आहे. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. झोडपलेल्या पावसाने प्रशासनाची चांगली झुंबड उडाली. या पावसात काही ठिकाणची झाडे मोडून खाली पडली आहेत. झाडे पडलेल्या ठिकाणी कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT