पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरातील कार्यकर्ते मुंबईत पोचले, पण...

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रीमंडळ विस्तारात समावेश झाल्याची खात्री असल्याने सोलापूर शहर व परिसरातील शेकडो कार्यकर्ते मुंबईत पोचले, पण यादीत शिंदे यांचे नाव नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आणि त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. सोमवारी सकाळी नऊ वाजले तरी सर्वजण उदास स्थितीत विविध ठिकाणी थांबून होते.

....आणि उत्साह मावळला
आज सोमवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात प्रणिती शिंदे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळणार असल्याची चर्चा गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला होता. नाव चर्चेत आल्यानंतर काहीजणांनी तातडीने मुंबईला जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार अनेकजण काल रविवारी रात्रीच मुंबईकडे रवाना झाले. मात्र ते मुंबईत पोचल्यावर महाराष्ट्र प्रदेश कॅंाग्रेसने प्रसिद्ध केलेली यादी सोशल मिडीयावर त्यांना पहायला मिळाली आणि त्यांचा उत्साहच मावळला. 

काहीजण परतीच्या प्रवासाला
मंत्रीमंडळाच्या यादीत प्रणिती शिंदे यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाल्याने मुंबईत गेलेल्या काही कार्यकर्त्यांनी लगेच परतीचा प्रवास सुरु केला आहे. शिंदे मंत्रीपदाची शपथ घेतानाच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हे कार्यकर्ते मुंबईत पोचले होते. अखेरच्या क्षणी शिंदे यांचे नाव यादीत का नाही याबाबत त्यांच्यामध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

पदाधिकारी निघणार रात्री
शपथविधी सोहळ्यासाठी सोलापुरातून युवक कॅांग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, एनएसयुआयचे गणेश डोंगरे, महिला पदाधिकारी, त्यांच्यासमवेत 50 ते 60 कार्यकर्ते गेले आहेत. आता ते दिवसभर जीवाची मुंबई करून रात्रीच्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सोलापूरकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT