100-bed sub-district hospital new water supply BJP city president Sushil Kshirsagar demanded Devendra Fadnavis sakal
सोलापूर

Solapur : मोहोळ येथे 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय उभारावे,नवीन पाणी पुरवठा सुरू करावी - सुशील क्षीरसागर

भाजपाचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे मागणी

राजकुमार शहा

मोहोळ : सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोहोळ तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढते आहे. रुग्णांना रुग्णालय स्तरावरील लोकसंख्येच्या आधारे योग्य त्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोहोळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात 100 खाटाचे सर्व सोयीनियुक्त उपजिल्हा रुग्णालय करावे,

शहरासाठी नविन पाणीपुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.तशा आशयाचे लेखी निवेदन त्यांनी दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी अंकुश अवताडे यांच्या समवेत शहर व तालुक्यातील अनेक प्रश्नावर चर्चा केली.

यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, खा रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान अवताडे आमदार सुभाष देशमुख , आमदार राम सातपुते, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनीष देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील, युवा उद्योजक धनंजय पाटील, बार्शीचे समाधान पाटील, दक्षिण मंडल तालुकाध्यक्ष महेश देवकर, उद्योजक यतीन शहा ,युवा मोर्चा मोहोळ तालुकाध्यक्ष गणेश झाडे, अक्षय अंजिखाने, गुरुनाथ तागडे, द्रोणाचार्य लेंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक प्रसंगी रुग्णांना उपचार मिळत नसल्याने बर्‍याचदा त्यांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठवावे लागते. योग्यवेळी उपचारा अभावी कित्येक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून मोहोळ येथे उपजिल्हा रुग्णालय झाले तर रुग्णांना सर्व सोयी सुविधा वेळेत मिळतील. तसेच मोहोळ शहरातील पाण्याची परिस्थीती अडचणीची आहे ,पावसाळयातही नागरीकांना पाणी विकत ध्यावे लागते त्यासाठी नवीन पाणी पुरवठा सुरु करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा २० मिनिटे ठप्प, प्रवाशांचा संताप

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT