Corona 2 
सोलापूर

पंढरपूर शहर-ग्रामीणमध्ये आज आढळले 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : आज पंढरपूरमध्ये ग्रामीण भागात सहा तर शहरामध्ये तब्बल 14 असे एकूण 20 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली. 

आज (बुधवारी) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, शहर व तालुक्‍यातील मिळून 20 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामीणमध्ये संपर्क व्यक्ती पाच (करकंब, गोपाळपूर, होळे, गुरसाळे, वाखरी प्रत्येकी एक) तर जगदंबानगर टाकळी येथे नवीन लक्षणे असलेला रुग्ण सापडला आहे. शहरामध्ये एकूण 14 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 13 संपर्क व्यक्ती तर एक लक्षणे असलेला नवीन रुग्ण आहे. महापूर चाळ, संत पेठमधील पाच, बागवान गल्ली सांगोला रोड येथील तीन, ज्ञानेश्वर नगरमधील दोन तर 
गांधी रोड, संत पेठ, घोंगडे गल्ली, शांतीनगर, लिंक रोड येथील प्रत्येकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली आहे. 

पंढरपूर शहर व तालुक्‍यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून तातडीने आवश्‍यक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु नागरिकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले आणि मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: वाळू माफियांचा रक्तरंजित हल्ला! फॉर्च्युनरमध्ये अडकवून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

देऊळ बंद 2 साठी पैसे नव्हते तेव्हा मदतीला धावून आला शाहरुख खान, प्रवीण तरडे म्हणाले...'त्यांनी 'बिल माफ करो' म्हणत...'

Latest Marathi News Live Update : शिरोळमधील पाणी प्रश्नावर शेतकरी आक्रमक, पाटबंधारे विभागाला घेरावाचा इशारा

Fifa World Cup 2026 : मेस्सी, रोनाल्डो यांची पुढील मॅच कधी? जाणून घ्या वेळापत्रक... दोघांना मिळालीय खास 'Badge' वाली जर्सी

Sanjay Raut Statement : 'मतदार संघात जाऊन बेईमान खासदारांना धडा शिकवणार, उद्धव ठाकरे-पवारांशी चर्चा'; संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT