Snake 
सोलापूर

अबब..! नागाची तब्बल 22 पिल्ले एकाच ठिकाणी सापडली; कोठे? वाचा... 

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी : कुर्डू (ता. माढा) येथील एका शेतकऱ्याच्या घरासमोरील कडब्याच्या गंजीखाली नागाची तब्बल 22 पिल्ले सापडली. या सर्व पिल्लांना सर्पमित्र राहुल अस्वरे यांनी सुरक्षितपणे पकडून वनाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असून, उद्या त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात येणार आहे. 

कुर्डू येथील शेतकरी भीमराव राऊत यांच्या घरासमोर कडब्याची मोठी गंज उभी केलेली आहे. दुपारच्या सुमारास कडबा काढताना लाकडाच्या फळीखाली राऊत यांना नागाचे पिल्लू दिसले. त्यांनी लगेच कुर्डुवाडी येथील सर्पमित्र राहुल अस्वरे यांच्याशी संपर्क साधला. श्री. अस्वरे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली व जमिनीलगत असलेल्या नऊ पिल्लांना सुरक्षितपणे पकडले. नंतर गंजीचा काही भाग काढून सुमारे तीन फूट खड्डा खणून जमिनीखालील नागाची पिल्ले बाहेर काढली. एकूण 22 पिल्ले या वेळी त्यांनी पकडली. यासाठी त्यांना सुमीत मस्के यांनी सहकार्य केले. त्यांनी वनरक्षक सुरेश कुर्ले यांच्याशी संपर्क साधला. त्या पिल्लांना बुधवारी निसर्गाच्या सान्निध्यात सुरक्षितपणे सोडले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

याबाबत सर्पमित्र राहुल अस्वरे म्हणाले, गेल्या 12 वर्षांपासून मी रहिवासी भागातील साप किंवा नाग पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडत आहे. परंतु इतक्‍या वर्षांच्या माझ्या कामात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने नागाची पिल्ले पकडली आहेत. ही पिल्ले साधारणपणे दीड ते दोन महिन्यांची आहेत. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप दिसून आल्यास त्याला मारू नका. सर्पमित्रांना संपर्क साधा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Accident: दुर्घटनेत शेतकरी कुटुंबाला मिळणार ५ लाखांपर्यंत मदत; भूमिहीन मजूर अन् बटाईदारांनाही संरक्षण, जाणून घ्या नियम!

राखी आरोग्यबंधन

Sanskrit School Students: संस्कृत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसाठी ७०० रुपयांपर्यंत वार्षिक मदत; काय आहे अर्ज प्रक्रिया?

ढिंग टांग : यह राखी बंधन है ऐसा..!

Ved Vyas Housing Scheme : मच्छीमारांना पक्क्या घरासाठी १ लाख २० हजारांची मदत; जाणून घ्या वेद-व्यास योजनेची माहिती

SCROLL FOR NEXT