Farmer 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील 36 हजार शेतकऱ्यांना बांधावर मिळाली खते, बियाणे 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील 7 हजार 965 शेतकरी गटांमार्फत 88 हजार 670 क्विंटल खते आणि 2 हजार 784 क्विंटल बियाण्यांचे शेतकऱ्यांच्या बांधावर वितरण करण्यात आले आहे. 36 हजार 324 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून यापुढेही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते वितरित केली जातील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली. 

पालकमंत्री दत्तात्रय भरणे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या बांधावर खते आणि बियाणे उपलब्ध करून द्या, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी नियोजन केले असून त्यानुसार खते आणि बियाणे वितरणास सुरवात केली आहे. त्यानुसार आत्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या 7965 शेतकरी गटांची मदत घेण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे आणि खतांसाठी प्रवास करावा लागणार नाही, असे बिराजदार यांनी सांगितले. 

खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा आहे. गेल्या तीन वर्षात सरासरी सर्व पिकांसाठी 31 हजार क्विंटल बियाणे वापरले गेले आहे. यावर्षी आजपर्यंत महाबीज मार्फत 4426 क्विंटल आणि खासगी कंपन्यांमार्फत 14062 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे, असे श्री. बिराजदार यांनी सांगितले. 

मागणीच्या 96 टक्के खताचा पुरवठा 
युरिया 235410, डीएपी 105700 क्विंटल, म्युरेट ऑफ पोटॅश 135800 क्विंटल, एनपीके -129800 क्विंटल तर सिंगल सुपर फॉस्फेट 61500 क्विंटल खते उपलब्ध झाली आहेत, असे श्री. बिराजदार यांनी सांगितले. कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता तपासणीसाठी 34 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक काम करीत आहेत. सनियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर एक आणि तालुका स्तरावर 11 भरारी पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती श्री. बिराजदार यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतापासून अमेरिकेपर्यंत शोध सुरू; गोल्डी ब्रार कॅनडाच्या टॉप मोस्ट वॉन्टेड यादीत कसा पोहोचला?

Miley Cyrus Wedding : पहिल्या लग्नाच्या ८ महिन्यांतच झाला होता घटस्फोट; आता मायली सायरस दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात!

Latest Marathi News Live Update : खराडीत तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

Tulsi Vivah Remedies for Marriage: लग्न जुळण्यात वारंवार अडथळे येतायत? तुळशी विवाहाच्या दिवशी करा ‘हे’ ५ उपाय, लवकर मिळेल मनासारखा जोडीदार!

पाकिस्तानी मंत्र्यांना ताजमहाल पाहण्याची इच्छा; भारत सरकारने दिला नकार, दौऱ्यात फक्त 'या' ठिकाणी जाण्याची परवानगी

SCROLL FOR NEXT